News Sand Policy : परभणी जिल्ह्यात ११ डेपोंवर मिळणार रेती

राज्य शासनाच्या रेती धोरणानुसार जिल्ह्यातील वाळूघाट डेपोची ई-निविदा प्रक्रिया २७ एप्रिलपासून सुरू झाली आहे.
Sand
Sand Agrowon

Parbhani News राज्य शासनाच्या रेती धोरणानुसार (Sand Policy) जिल्ह्यातील वाळूघाट डेपोची ई-निविदा प्रक्रिया २७ एप्रिलपासून सुरू झाली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पर्यावरण संमती प्राप्त २३ रेती घाटाकरिता ११ ठिकाणी डेपो निश्चित करण्यात आले आहेत.

या ठिकाणाहून नागरिकांना रेती उपलब्ध होईल. त्यासाठी महाखनिज प्रणालीवर आधार क्रमांकासह नोंदणी करणे आवश्यक आहे अशी माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. ओमप्रकाश गोंड यांनी दिली.

रेतीबाबतची ई-निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन रेतीघाटांसह डेपोंचा ताबा यशस्वी निविदाधारकास देण्यात येणार आहे. त्यानंतर नागरिकांनी मागणी नोंदविल्यानुसार या डेपोवरून रेती उपलब्ध होणार आहे. त्यासाठी महाखनिज प्रणालीवर आधार क्रमांकासह नोंदणी करणे आवश्यक आहे.

Sand
Maharashtra Sand Policy: माफियांकडून वाळू घेऊ नका...

सेतू केंद्रामार्फतही नागरिकांना नोंदणी करता येणार आहे. मागणी नोंदविल्यानंतर १५ दिवसांच्या आत डेपोमधून रेती घेऊन जाणे ग्राहकांवर बंधनकारक असेल. एका कुटुंबास एका वेळी कमाल ५० टन रेती देय आहे.

त्यानंतर वाढीव रेती हवी असल्यास ती मिळाल्याच्या तारखेपासून एका महिन्यानंतर रेतीची मागणी करता येईल. यासाठी जिल्ह्यात ११ ठिकाणी डेपो निश्‍चित करण्यात आले आहेत.

घाटातून रेती उत्खनन, रेतीची डेपोपर्यंत वाहतूक, डेपोनिर्मिती, व्यवस्थापन व विक्री करण्यासाठी ई-निविदा www.parbhani.nic.in व https://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.

ई-निविदा सादर करण्याची विहित मुदत बुधवारी (ता. ३) सायंकाळी ५ वाजेपर्यंत होती. विहित मुदतीत ११ रेती डेपोपैकी केवळ सोनपेठ तालुक्यातील खडका येथील डेपोकरिता तीन ई-निविदा प्राप्त झाल्या आहेत.

Sand
Sand Rate : स्वस्तात वाळू धोरणाच्या अंमलबजावणीचा मुहूर्त का लांबला?

उर्वरीत १० डेपोसाठी मंगळवारी (ता. ९) दुपारी ३ वाजेपर्यंत ई-निविदा सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी इच्छुक मान्यता प्राप्त संस्था, व्यक्तींना ई-निविदा सादर करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.

किमान तीन ई-निविदा प्राप्त मौजे खडका येथील रेतीडेपोची ई-निविदा उघडण्याचा दिनांक पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार सोमवारी (ता. ८) दुपारी १२ वाजता असून, ई-निविदा उघडल्यानंतर लवकरच डेपो सुरू करण्यात येईल.

रेतीडेपो असे...

जिल्ह्यात ११ ठिकाणी रेतीडेपो निश्‍चित करण्यात आलेले आहेत. त्यात उखळद (ता. परभणी), राजुरा (ता. मानवत), खुपसा (ता. सेलू), गौडगाव (ता. गंगाखेड), लक्ष्मणनगर (ता. पूर्णा), खडका (ता. सोनपेठ), शेळगाव (ता. सोनपेठ), बरबडी (ता. पालम), भोगाव (ता. पालम), मानकेश्‍वर काकडे, वझर (ता. जिंतूर) यांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com