Rabi Sowing : यंदाच्या रब्बी हंगामात पेरण्यांची गती संथच

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नोव्हेंबरच्या पहिल्या सप्ताहापर्यंत शिवारात पाणी साचले होते.
Rabi Sowing
Rabi SowingAgrowon

नाशिक : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) नोव्हेंबरच्या पहिल्या सप्ताहापर्यंत शिवारात पाणी साचले होते. परिणामी वेळेवर वाफसा न झाल्याने यंदा रब्बी हंगामातील (Rabi Season) पेरण्या (Rabi Sowing) काहीशा लांबणीवर गेल्याची स्थिती आहे; मात्र पाणीसाठा (water reservoir) मुबलक झाल्याने गहू क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे तर रब्बी मक्याकडे शेतकरी वळत असल्याचे दिसून येत आहे. हरभरा पिकाचे क्षेत्रही यंदा वाढत असल्याची स्थिती आहे; मात्र असे असताना पेरण्यांना अजून अपेक्षित गती आलेली नाही. कृषी विभागाच्या (Department of Agriculture) पेरणी अहवालानुसार जिल्ह्यात अद्याप १७ टक्के पेरण्या झाल्या आहेत.

Rabi Sowing
Rabi Irrigation : कुकडी प्रकल्पातून रब्बीचे आवर्तन सुरू करण्याची मागणी

जिल्ह्यात १ लाख १८ हजार ४४ हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामातील पेरण्या प्रस्तावित आहेत. नोव्हेंबरअखेर २० हजार २७५ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यामुळे डिसेंबरअखेर पेरण्या टप्प्याटप्प्याने होणार असल्याची स्थिती आहे. जिल्ह्याच्या नांदगाव, देवळा, कळवण, येवला तालुक्यांत पेरण्यांना वेग आला आहे. चांदवड, निफाड, सिन्नर, नाशिक, पेठ, इगतपुरी, त्र्यंबकेश्र्वर, नाशिक तालुक्यांत किरकोळ स्वरूपात पेरण्या पूर्ण झाल्याची स्थिती आहे. मालेगाव तालुक्यात अद्याप अपेक्षीत गती आलेली नाही. अनेक भागांत पाऊस झाल्याने पेरण्या लांबणीवर गेल्या आहेत. अशा भागांत वाफसा अवस्थेनंतरच पेरण्या होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

अन्नधान्य पिकामध्ये ज्वारीचे क्षेत्र कमी झाले आहे. कळवण, नांदगाव, सुरगाणा, सिन्नर व मालेगाव तालुक्यांत झालेल्या पेरण्यासुद्धा कमीच आहेत. यंदा गव्हाच्या पेरण्या वाढण्याची शक्यता आहे. शेतकरी पेरणीपूर्व तयारी करण्यात व्यग्र दिसून येत आहेत. येवला, दिंडोरी, कळवण, मालेगाव, निफाड, नांदगाव, चांदवड, सिन्नर, देवळा येथे पेरणी झाली आहे. तर पश्चिम पट्ट्यातील पेठ, इगतपुरी, त्र्यंबकेश्र्वर तालुक्यांत हे प्रमाण कमी आहे. यासह रब्बी मका क्षेत्रही येवला, मालेगाव, नांदगाव तालुक्यांत वाढत आहे. उन्हाळ कांदा रोपांच्या नुकसानीमुळे याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. कडधान्य पिकात हरभऱ्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसत आहे.

Rabi Sowing
Agri Tourism : विषमुक्त शेतीतून कृषी पर्यटनाला आधार

गळीत धान्य क्षेत्रावर पेरण्या नसल्यासारख्याच

जिल्ह्यात पूर्वी शेतकरी क्षेत्राप्रमाणे थोड्याफार प्रमाणात का होईना तेलबिया पिके घ्यायचे; मात्र उत्पादकता नसल्या कारणाने व दर्जेदार बियाणे उपलब्ध होत नसल्याने आता शेतकऱ्यांनी या पिकांकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. सूर्यफूल, जवस, तीळ या गळीत पिकांची पेरणी झालेली नाही. किरकोळ प्रमाणात ४७ हेक्टरवर पेरणी अपेक्षित असताना २ हेक्टरवर झाली आहे. ही टक्केवारी अवघी ४.२३ टक्के इतकी आहे.

जिल्ह्यातील पेरण्यांची स्थिती

पीक प्रस्तावित क्षेत्र पेरणी

(हेक्टरमध्ये) टक्केवारी

ज्वारी ४७९९ ८५९.४५ १७.९१

गहू ६७१९८.३५ ९

मका ८४१४.२ १३९२ १६.५४

हरभरा ३५६२१.४६ ८१२५.८५ २२.९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com