Wet Drought : ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट पंचनामे करावे

संगमनेर तालुक्यातील सर्व गावांमध्ये सततचा पाऊस पडून सोयाबीन पिकासह सर्व खरीप पिके वाया गेली आहेत.
Wet Drought
Wet DroughtAgrowon

नगर : संगमनेर तालुक्यातील सर्व गावांमध्ये सततचा पाऊस (Heavy Rainfall) पडून सोयाबीन पिकासह (Soybean Crop Damage) सर्व खरीप पिके (Kharip Crop) वाया गेली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करून तातडीने भरीव मदत मिळावी व तालुक्यात ओला दुष्काळ (Wet Drought) जाहीर करावा या मागणीसाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात (Balasabh Thorat) यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या वतीने बुधवारी (ता. १९) ठिय्या आंदोलन करण्यात आले.

Wet Drought
Rabbi Season : नांदेड जिल्ह्यातून रब्बीसाठी दोन लाख टन खतांची मागणी

तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीत मदत मिळावी यासाठी संगमनेर प्रांताधिकारी कार्यालय येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन करीत निवेदन देण्यात आले. या वेळी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, इंद्रजित थोरात, तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, शहराध्यक्ष सोमेश्‍वर दिवटे, रामहरी कातोरे,

लक्ष्मणराव कुटे नवनाथ अरगडे, संपतराव डोंगरे, अजय फटांगरे, निखिल पापडेजा, नितीन अभंग, संतोष हासे, विजय राहणे, राजेंद्र चकोर, आनंद वर्पे, बादशहा वाळुंज, जावेद शेख, जयराम ढेरंगे, संतोष नागरे, सुनील कडलग आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.संगमनेर तालुक्यात सोयाबीन पीक व इतर खरीप पिके वाया गेली आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com