Land And Water Management : शाश्वत जमीन आणि पाणी व्यवस्थापन प्रकल्प सुरू

केशवराज ॲग्रो प्रोडूसर कंपनी लिमिटेड, जालनातर्फे आणि जागतिक निसर्ग निधी दिल्ली आणि ‘आयकेइए’ यांच्या सहयोगाने जालना तालुक्यातील ६१ गावांमध्ये ‘शाश्वत जमीन आणि पाणी व्यवस्थापन प्रकल्प’ २०१९ पासून राबविणे सुरू आहे.
Water management
Water managementAgrowon

जालना : केशवराज ॲग्रो प्रोडूसर कंपनी (Keshavraj Agro Producer Company) लिमिटेड, जालनातर्फे आणि जागतिक निसर्ग निधी दिल्ली आणि ‘आयकेइए’ यांच्या सहयोगाने जालना तालुक्यातील ६१ गावांमध्ये ‘शाश्वत जमीन आणि पाणी व्यवस्थापन ( Water Management) प्रकल्प’ २०१९ पासून राबविणे सुरू आहे. त्या अंतर्गत २० गावांमध्ये २०२१ मध्ये ११०००, तर यंदा १३००० बांबूच्या झाडांची लागवड केली आहे. मागील वर्षापासून ८० किलोमीटर जैविक बांधांची निर्मिती झाली आहे.

Water management
Water Supply Scheme : पाणीपुरवठा योजना प्रकरणात झेडपी अध्यक्ष, ‘सीईओं’ना नोटीस

दरम्यान, ‘घर परत्वे झाड’ अंतर्गत ऑगस्ट २०२२ मध्ये पहिल्या टप्प्यात पाच गावांत ८०० झाडे प्रतिघर यानुसार वितरित केली आहेत. दुसऱ्या टप्प्यांमध्ये १७५० झाडे दहा गावांमध्ये वितरित केली आहेत. २०२१ मध्ये ५० गावामध्ये शंभर एकरावर कॉटन श्रेडिंग करण्यात आली आहे.

प्रकल्पांतर्गत राबविले जाणारे उपक्रम
- ओढ्याच्या प्रवाहाला आडवे नेपियर ग्रासची लागवड करून जैविक बांध तयार करणे
- ओढ्याच्या दुतर्फा चार मीटर अंतरावर बांबू लागवड
- शेतकऱ्यांना आंतरपीक आणि एकत्र पीक पद्धतीबद्दल जागरूक करणे
- शेतकऱ्यांना कंपोस्ट खत निर्मितीसाठी प्रोत्साहित करणे
- कापूस पिकात काढणी पश्चात पिकांचे अवशेष जमिनीत नष्ट करून त्याचे सेंद्रिय खत तयार करण्यासाठी पऱ्हाटी श्रेडिंग करून देणे
- मोसंबी, डाळिंब, सीताफळ, आवळा, चिंच यासारख्या फळ पिकांचे व बागांचे संवर्धन करण्यासाठी मदत करणे.

बीसीआय प्रकल्पा अंतर्गत कार्य असे...
जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त तत्त्वावर आधारित विषयांवर शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे, रासायनिक कीटकनाशकांच्या दुष्परिणामांची तीव्रता कमी करणे, हानिकारक कीटकनाशकांचा वापर बंद करणे, जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवून जमिनीचे आरोग्य सुधारणे, कापसामध्ये धाग्याच्या गुणवत्तेकडे लक्ष देणे, शेतीकामात बालमजूरांचा वापर थांबवणे.

केशवराज ॲग्रो प्रोडूसर कंपनी या प्रकल्पात सहभागी आहे. सुरुवात बीसीआय उपक्रमापासून झाली. आता इतर उपक्रमांना हात घातला जातो आहे. माती अडवली म्हणजे पाणी अडेल त्यासाठी काम सुरू आहे.


- उद्धवराव खेडेकर अध्यक्ष,
केशवराज ॲग्रो प्रोडूसर कंपनी.

Water management
Agri Tourism : विषमुक्त शेतीतून कृषी पर्यटनाला आधार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com