
संग्रामपूर, जि. बुलडाणा : पीक नुकसानीच्या (Crop Damage) तुलनेत शेतकऱ्यांना मिळालेली रक्कम तुटपुंजी असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्यासह शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. ५) संग्रामपूर तालुका कृषी कार्यालयावर धडक दिली आहे. या प्रसंगी शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी करण्यात आली.
यावर्षी अतिवृष्टीमुळे पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान होऊनही विमा कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. नुकसानीच्या तुलनेत शेतकऱ्यांना तोकडी भरपाई देऊन कंपनीने चेष्टा केली आहे. याचाच आक्रोश करीत शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयासमोर प्रचंड घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांची आक्रमकता पाहून कृषी कार्यालयासमोर तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या प्रसंगी प्रशांत डिक्कर यांनी जिल्ह्यातील ४६ हजार शेतकऱ्यांना आतापर्यंत एक छदामही सुद्धा विमा कंपनीने दिला नाही. तसेच कंपनीची चौकशी करून कारवाई करावी व शेतकऱ्यांना १०० टक्के पीकविमा नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली.
या वेळी आंदोलनात तालुकाध्यक्ष विजय ठाकरे, उज्वल खराटे, संतोष खेर्डे, सागर मोरखडे, कालिमोद्दीन काजी,धनंजय कोरडे, विशाल चोपडे, विठ्ठल ताठोड, प्रशांत बावसकर, दत्ता डिक्कर, शिवा वरटकार, रोशन देशमुख यांच्यासह कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.