Mushroom Festival : कृषी महाविद्यालयात ‘चविष्ट मशरूम’ महोत्सव

मशरूम हा पोषणमूल्ययुक्त आरोग्‍यदायी घटक असून, त्याअनुषंगाने समाजात जागृती करण्‍याची गरज आहे. मशरूमचे उत्‍पादन व पुरवठ्यात सातत्‍य असायला हवे.
Mushroom Festival in Parbhani News
Mushroom Festival in Parbhani NewsAgrowon

Parbhani News: ‘‘मशरूम (Mushroom) हा पोषणमूल्ययुक्त आरोग्‍यदायी घटक असून, त्याअनुषंगाने समाजात जागृती करण्‍याची गरज आहे. मशरूमचे उत्‍पादन (Mushroom Production) व पुरवठ्यात सातत्‍य असायला हवे.

कृषी अभ्यासक्रमातील अनुभवातून शिक्षण कार्यक्रमातून (ईएलपी) विद्यार्थ्यांना शेतीमाल प्रक्रिया ते विपणन याबाबतचे प्रत्यक्ष अनुभव मिळतो. हा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवावा. त्यातून उद्योजक घडले पाहिजेत,’’ असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी केले.

Mushroom Festival in Parbhani News
Mushroom Farming : धिंगरी अळिंबी उत्पादन तंत्रज्ञान

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील वनस्पती रोगशास्‍त्र विभागाच्‍या अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रमाच्‍या विद्यार्थ्‍यांतर्फे मंगळवारी (ता.३१) चविष्‍ट मशरूम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते अध्यक्षस्थानी होते.

Mushroom Festival in Parbhani News
Mushroom : आंबेगाव, जुन्नरमधील आदिवासी महिलांना मशरूमचे प्रशिक्षण

शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, विद्यापीठ अभियंता दीपक कशाळकर, प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, विभाग प्रमुख डॉ. कल्‍याण आपेट आदींची उपस्थिती होती. डॉ. सय्यद इस्माईल म्‍हणाले, ‘‘मशरूम हे प्रथिने, पचनशील फायबर, खनिजे आदी घटकयुक्त आहे.

’’ प्रास्‍ताविकात डॉ. आपेट यांनी मशरूमपासून विद्यार्थ्‍यांनी बनविलेल्या विविध पदार्थांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी मशरूमपासून बनविलेले धपाटे, भजी, पिझ्झा, वडापाव, बिर्याणी, सँडविच आदी पदार्थांचे प्रदर्शन लावण्‍यात आले होते. कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी विद्यार्थ्‍यांचे कौतुक केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com