Weather Update : राज्यातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता

राज्याच्या कमाल, किमान तापमानात चढ-उतार सुरूच आहे. राज्यात सध्या निरभ्र आकाश असल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. तर किमान तापमानात घट राज्याच्या काही भागांत झाल्याने गारठा जाणवत आहे.
Weather Update
Weather UpdateAgrowon

पुणे : राज्याच्या कमाल, किमान तापमानात (Temperature) चढ-उतार सुरूच आहे. राज्यात सध्या निरभ्र आकाश असल्याने उन्हाचा चटका (Heat) वाढला आहे. तर किमान तापमानात घट राज्याच्या काही भागांत झाल्याने गारठा (Cold) जाणवत आहे. आज (ता. २३) मध्य महाराष्ट्र, विदर्भात किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Weather Update
Agriculture Electricity : कृषिपंपांची नादुरुस्त रोहित्रे तत्काळ बदलण्याची मोहीम सुरू

राज्याच्या किमान तापमानात घट झाल्याने परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात राज्यातील निचांकी १०.५ अंश तापमानाची नोंद झाली. धुळे येथील कृषी महाविद्यालयात ११ अंश, औरंगाबाद येथे ११ अंश, निफाड येथे ११.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा ११ ते २० अंशांच्या दरम्यान होता.

Weather Update
Agriculture Vacancy : जलसंधारणाची ६७० रिक्त पदे भरण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम

तर रत्नागिरी राज्यातील उच्चांकी ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यातही बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३० अंशांच्या पार आहे. कमाल आणि किमान तापमानातही ११ ते २० अंशांपर्यंतची तफावत दिसून येत आहे. परिणामी, पहाटे गारठा, तर दुपारी चटका अशी स्थिती अनुभवायला मिळत आहे.

राजस्थानातील चुरू येथे गुरुवारी (ता. २२) देशाच्या सपाट भू-भागावरील नीचांकी ५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तरेकडील पंजाब, हरियाना, राजस्थान या राज्यांमध्येही थंडीची लाट कायम राहण्याचा इशारा आहे. तर हरियाना, चंडीगड, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेशात दाट धुक्याची स्थिती कायम राहणार आहे. आजपासून राज्याच्या तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ ठळक कमी दाब क्षेत्र

नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात विषुववृत्ताजवळ असलेले ठळक कमी दाब क्षेत्र श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ आले आहे. या प्रणालीची तीव्रता वाढत आहे. आज (ता. २४) हे तीव्र कमी दाब क्षेत्र (डिप्रेशन) भारत आणि श्रीलंकेच्या दरम्यान असलेल्या कोमोरिन भागाकडे सरकण्याची शक्यता आहे.

गुरुवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान. (अंश सेल्सिअसमध्ये)

पुणे ३१.६ (१२.९), जळगाव ३१.७ (१३.४), धुळे ३१ (११), कोल्हापूर ३१.८ (१७), महाबळेश्‍वर २८.६ (१५), नाशिक ३१.९ (१३.२), निफाड ३१.४ (११.२), सांगली ३२.२ (१५.१), सातारा ३२.४ (१४.३), सोलापूर ३४.५ (१५.९), सांताक्रूझ ३४.३(२०), डहाणू २९.९ (१९.१), रत्नागिरी ३५ (१८.५), औरंगाबाद ३१.५ (११), नांदेड ३१.६ (१४.८), परभणी ३१.८ (१३.६), अकोला ३३.२ (१४.८), अमरावती ३२.२ (१४.१), बुलडाणा ३१ (१४.८), ब्रह्मपुरी ३२.७ (१४.६), चंद्रपूर २९.४ (१५.२), गडचिरोली ३१.४ (१३), गोंदिया ३० (१२), नागपूर ३१.१ (१३.३), वर्धा ३१.१ (१४), यवतमाळ ३२.२ (१३.५).

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com