Climate Change : चिकू, मिरची पिकाच्‍या उत्पादनाला मोठा फटका

डहाणू तालुक्यात मोठ्या प्रमाणात मिरची आणि चिकूचे उत्पादक शेतकरी आहेत. यात साधी मिरची व ढोबळी मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते, पण वातावरण बदलामुळे चिकू आणि मिरचीच्या उत्पादनात घट झाली आहे.
Climate Change
Climate ChangeAgrowon

कासा : डहाणू तालुक्यात मोठ्या प्रमाणात मिरची (Chili) आणि चिकूचे उत्पादक (Chiku Farmer) शेतकरी आहेत. यात साधी मिरची व ढोबळी मिरचीचे उत्पादन (Capsicum Production) मोठ्या प्रमाणात घेतले जाते, पण वातावरण बदलामुळे (Climate Change) चिकू आणि मिरचीच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक बागायतदारांवर संकट उभे ठाकले आहे.

डहाणू तालुक्यात साधारणपणे ८०० हेक्टर क्षेत्रात साधी मिरची, तर २५० हेक्टर क्षेत्रात भोपळी मिरचीचे उत्पादन घेतले जाते. यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरले जाते. मिरचीसह विविध प्रकारच्या फुलांचे उत्पादन घेतले जाते. पण मिरचीच्या पिकाची वाढ खुंटली असल्याचे येथील शेतकरी सांगतात. डहाणू तालुक्यात सध्या मोठमोठे प्रकल्प सुरू आहेत.

Climate Change
Climate Change : नेमका प्राधान्यक्रम ठरविण्याची आवश्यकता

यात रेल्वे मार्ग रुंदीकरण, बुलेट ट्रेन, वडोदरा एक्स्प्रेस वे, वाढवण बंदर या प्रकल्पांच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम, बांधकाम सुरू आहे. तसेच या कामासाठी लागणाऱ्या वस्तूंची ने-आण करण्यासाठी अवजड वाहनांची मोठी वर्दळ सुरू आहे. अनेक ठिकाणी बांधकामासाठी लागणारी खडी, रेती, रेडीमिक्स काँक्रिट तयार करणारे प्लांट उभे राहिले आहेत.

यातून मोठ्या प्रमाणात धुळीचे कण हवेत मिसळत आहेत. येथील वातावरणात बदल झाला असून याचा परिणाम येथील पारंपरिक पिकांवर होत आहे. प्रदूषणकारी मोठे प्रकल्प निर्माण झाल्याने पर्यावरणाला धोका पोहोचत असून याचा परिणाम शेतीवर होत आहे.

Climate Change
Climate Change : वातावरण बदल, पाणी यांचा परस्परसंबंध

वाढत्या थंडीमुळे नुकसान

कडाक्याच्या थंडीमुळे चिकूच्या फळ उत्पादनावरही परिणाम झाला आहे. मागच्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी सुरू झाल्याने चिकूची फळे झाडावरच अकाली पिकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या वाढत्या थंडीमुळे झाडाखाली चिकूचा सडा पडला आहे.

सध्या वातावरण बदलामुळे अनेक बागायतदारांच्या पिकांवर परिणाम होत आहे. यासाठी काही दिवसांपूर्वी पर्यावरण शास्त्रज्ञांची एक टीमदेखील येथील भागात येऊन पाहणी करून गेली. सध्या या भागात अनेक चिकू, मिरची, फुले या पिकांवर परिणाम होत आहे.

- विनायक बारी, अध्यक्ष, चिकू उत्पादक संघ

जवळपास दहा एकर जागेवर ढोबळी मिरचीची लागवड केली होती, पण सध्या वातावरण बदलाचा परिणाम होऊन पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे औषध फवारणी करूनदेखील पिकाची वाढ होत नाही. त्यामुळे कंटाळून हे सर्व पीक काढून टाकले आहे.

- किशोर जाधव, ढोबळी मिरची उत्पादक

थंड वातावरणात पिकांची वाढ खुंटते. अशात हवेत धूलिकण पसरत असल्याने पिकांवर परिणाम होतो.

- एन. नर्गुळकर, तालुका कृषी अधिकारी, डहाणू

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com