Prakash Ambedkar : ...तर ठाकरे गट निवडणुकीपासूनही वंचित राहील

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नवीन पक्ष स्थापन करावा लागेल.
Udhhav Thackeray Prakash Ambedkar
Udhhav Thackeray Prakash AmbedkarAgrowon

Maharashtra Politics News अकोला ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला शिवसेना पक्षाचे (Shivsena Party Name) नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांना नवीन पक्ष स्थापन करावा लागेल.

त्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी जाईल. सध्याची परिस्थिती पाहता त्यापूर्वी म्हणजे एप्रिल अखेरीस विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

Udhhav Thackeray Prakash Ambedkar
Shivsena : धनुष्यबाण आणि शिवसेना नाव शिंदे गटाला

अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे गटाला एक राजकीय पक्ष म्हणून निवडणुकीपासून वंचित राहावे लागू शकते, अशी शक्यता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. येथे सोमवारी (ता. २०) घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ॲड. आंबेडकर म्हणाले, की निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय मान्यच करावा लागेल. वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे गटासोबतच्या युतीवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही.

Udhhav Thackeray Prakash Ambedkar
Udhhav Thackeray : ठाकरे-आंबेडकर यांच्यात युतीबाबत सकारात्मक चर्चा

आमची युती वैयक्तिक असल्याची पुष्टीही त्यांनी जोडली. त्यासोबत त्यांनी महाविकास आघाडीत ‘वंचित’ला घेण्याबाबतचा निर्णय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला घ्यायचा आहे. आमची युती ही ठाकरे यांच्यासोबत आहे.

इतर पक्षांसोबत नाही. महाविकास आघाडीसाठी उद्धव ठाकरे यांनी काही वेगळा निर्णय घेतला तर आम्ही पुन्हा एकटेच निवडणुकीला सामोरे जाऊ, असेही आंबेडकर म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेली युती ही २०२४ पर्यंत होणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी आहे. त्यात लोकसभा, विधानसभा निवडणुकीसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा समावेश असल्याचेही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com