APMC Election in Junnar : जुन्नर बाजार समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी शनिवार व रविवारी शासकीय सुट्टीमुळे शुक्रवारी (ता. ३१) ५२ तर एकूण ९५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
APMC Election
APMC ElectionAgrowon

Pune News जिल्ह्यातील आर्थिक सत्ता केंद्र असलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी (APMC Election) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी (ता. ३) शेवटचा दिवस असून, रामनवमी, शनिवार आणि रविवार अशा तीन शासकीय सुट्ट्यांमुळे इच्छुक उमेदवारांना कागदपत्रांची पूर्तता न करता आल्याने आता शेवटच्या दिवशी धांदल उडणार आहे. (Latest Agriculture News)

दरम्यान, जिल्ह्यातील हवेली (पुणे)सह जुन्नर, खेड, आंबेगाव, पुरंदर, इंदापूर, बारामती बाजार समित्यांमध्ये मोठी चुरस निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणावर अर्जांची विक्री झाली आहे. मात्र भोरमध्ये केवळ चारच अर्ज दाखल झाल्याने भोर बाजार समिती बिनविरोध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी शनिवार व रविवारी शासकीय सुट्टीमुळे शुक्रवारी (ता. ३१) ५२ तर एकूण ९५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सोमवारी (ता. ३) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने मोठ्या संख्येने अर्ज दाखल होतील अशी चर्चा आहे. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात ३६८ उमेदवारी अर्जाची विक्री झाली आहे.

APMC Election
APMC Election : शेतकऱ्यांना मदत करण्याची सरकारची भूमिका

यामध्ये कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था मतदार संघाच्या सर्वसाधारण गटासाठी-४४, इतर मागासवर्गीय गटात-१०, वि.जा. भ.ज. व विशेष मागास प्रवर्ग राखीव गटात ५, ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण गटात १२, अनुसूचित जाती-जमाती राखीव-४, आर्थिक दुर्बल घटक-३, व अडते-व्यापारी मतदारसंघ-११, हमाल-तोलारी मतदार संघ एक अर्ज आला असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एच. एस. कांबळे यांनी सांगितले.

सहकारी संस्था मतदार संघात ११ जागांसाठी ९४८ तर ग्रामपंचायत मतदार संघात चार जागांसाठी १३३२, अडते-व्यापारी मतदार संघात दोन जागांसाठी १०२६ व हमाल-तोलणार मतदार संघात एका जागेसाठी १७८ असे एकूण ३४८४ मतदार आहेत.

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आतापर्यंत ३९ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून (३१ मार्च) अखेर अनेक दिग्गज उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तसेच तालुक्याच्या राजकारणातील अनेक वजनदार उमेदवारांनी अर्ज नेले असल्याने बाजार समितीची निवडणूक खूपच चुरशीची होण्याचे संकेत मिळत आहेत.

APMC Election
APMC Election : वाशीम बाजार समिती निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी एका मांडवात

अर्ज दाखल करताना शेतकरी दाखला जोडण्याचा नवा नियम आल्याने तो घेण्यासाठी नागरी सुविधा केंद्रात झुंबड उडाली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या तीन दिवसांत केवळ ४ अर्ज दाखल होते. पण काल तब्बल ३५ अर्ज दाखल झाले.

आता सोसायटी मतदार संघात २८, ग्रामपंचायत मतदार संघात ५, आडते व्यापारी मतदार संघात ५ आणि हमाल मापाडी मतदार संघात १, असे एकूण ३९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तसेच आजपर्यंत एकूण २०५ उमेदवारी अर्जाची विक्री झालेली असून आता फक्त ३ एप्रिल हा एकच दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राहिलेला असल्याने त्यादिवशी तुडुंब गर्दी होण्याची चिन्हे आहेत.

भोर बिनविरोधच्या दिशेने

भोर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शनिवार (ता. १)पर्यंत केवळ चारच उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पंढरीनाथ घुगे यांनी दिली. सोमवारी (ता. ३) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी इतर सर्व इच्छुक उमेदवार आपले अर्ज दाखल करणार आहेत.

त्यामुळे अर्ज दाखल करण्याच्या सोमवारी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास गर्दी होणार आहे. बाजार समितीच्या १८ जागांसाठी शनिवारपर्यंत केवळ चारच उमेदवारांनी अर्ज दाखल केले असल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com