
Akola News : आत्मा यंत्रणा व कृषी विज्ञान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यांतर्गत पशुपालकांसाठी दुग्ध उत्पादन (Milk Production) व प्रक्रिया (Agriculture Processing) विषयावरील एकदिवसीय प्रशिक्षण बुधवारी (ता. एक) कृषी विज्ञान केंद्रात झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केव्हीकेचे प्रमुख डॉ. उमेश ठाकरे होते.
या वेळी मार्गदर्शक म्हणून केव्हीकेचे विषय विशेषज्ञ (पशुविज्ञान) डॉ. गोपाल मंजुळकर, स्नातकोत्तर पशुविज्ञान संस्थेचे डॉ. कुलदीप देशपांडे व डॉ. गिरीश पंचभाई, आत्माचे तालुका तंत्र व्यवस्थापक किरण दंदी, दीपक मोगरे, विजय शेगोकार,संदीप गवई उपस्थित होते.
डॉ. मंजुळकर यांनी जनावरांची निवड, त्यांचे आजार व घरगुती उपचाराबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. आजच्या काळात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची मोठी बाजारपेठ उपलब्ध असून, यात तरुणांना दुग्ध व्यवसाय करण्यास खूप वाव असल्याचे सांगितले.
डॉ. देशपांडे यांनी जनावरांच्या आहाराबद्दल माहिती देताना सकस व योग्य आहार हाच जनावराच्या सुदृढ आरोग्याचा घटक असल्याचे नमूद केले. घरगुती पोषक खाद्यनिर्मितीबद्दल सविस्तर माहिती दिली.
डॉ. चभाई यांनी दुधाळ जनावरांचे गोठे अस्वच्छ असल्यास गोचीडजन्य व स्तनदाहसारखे आजार फैलावत असून, त्याचे विपरित परिणाम होऊ शकतात, असे सांगितले.
कीर्ती देशमुख यांनी दुग्धजन्य पदार्थ निर्मितीबद्दल सखोल मार्गदर्शन केले. डॉ. ठाकरे यांनी पशुपालकांना कृषी विज्ञान केंद्राद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली.
या कार्यक्रमास जिल्हाभरातून २५० पेक्षा अधिक पशुपालक हजर होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुलदीप देशमुख यांनी केले. आभार कीर्ती देशमुख यांनी आभार मानले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.