Animal Feed Management : दुधाळ जनावरांचे योग्य आहार व्यवस्थापन तुम्हाला माहितेय का?

जनावरांना दिवसातून फक्त एकच वेळ खाद्य दिल्यास त्यांची पचनसंस्थेचे कार्य मंदावते. गाईला सौम्य रुमेन ऍसिडोसीस आजार होण्याची शक्यता जास्त असते.
Animal Feed Management
Animal Feed ManagementAgrowon

डॉ. लिंबाजी अण्णा साळवे

Animal Feed Management : जनावरांच्या पचन संस्थेचे आरोग्य चांगले राखण्यासाठी योग्य आहार व्यवस्थापनावर (Feed Management) भर देणे गरजेचे असते. दिलेल्या आहाराचे योग्य पचन (Digestion) होऊन त्यातील पोषक घटकांचा वापर विविध कार्यासाठी केला जातो.

त्यामुळे जनावरांचे आरोग्य चांगले राखले जाऊन एकूण दूध उत्पादनात (Milk Production) वाढ मिळते. त्यासाठी जनावरांच्या पचन संस्थेचे आरोग्य उत्तम असणे आवश्यक आहे. पचन संस्थेचे आरोग्य जपण्यासाठी खालील बाबी विचारात घ्याव्यात.

दूध देणाऱ्या गायींचे आहार व्यवस्थापन ः

जनावरांना दिवसातून फक्त एकच वेळ खाद्य दिल्यास त्यांची पचनसंस्थेचे कार्य मंदावते. गाईला सौम्य रुमेन ऍसिडोसीस आजार होण्याची शक्यता जास्त असते. जनावरांना सतत आहार दिल्यास एकूणच रवंथ करण्याच्या वेळेत वाढ होते. त्यामुळे लाळेचे प्रमाण ही वाढते.

जनावरांना सतत योग्य प्रमाणात खाद्य दिल्यामुळे प्रथिने आणि फॅट यांची पचन आणि आतड्यांतील जीवनसत्त्वांच्या जैवसंश्लेषणाच्या प्रक्रियेस मदत मिळते. त्यामुळे जनावरांच्या उत्पादनांसाठी आवश्यक पोषकतत्त्वांचा सुयोग्य वापर होतो.

Animal Feed Management
Animal Care : जनावरांच्या आजारांवर गुणकारी असणाऱ्या वनस्पतींची माहिती

दैनंदिन आहार ः

- जनावरांच्या दैनंदिन आहारात जास्त प्रमाणात धान्याचा वापर केल्यास क्लोस्ट्रिडीअम परफ्रिन्जेन्स नावाच्या जिवाणूंची झपाट्याने वाढ होते.

त्यामुळे जनावरे दगावण्याची शक्यता वाढते. आहारामध्ये धान्य जास्त असेल तर पचनसंस्थेमध्ये ई-कोलाय या जिवाणूंची देखील वाढ अधिक प्रमाणात होण्याची शक्यता असते.

- जास्त प्रमाणात धान्ययुक्त घटकांचा वापर केल्यामुळे लाळ निर्मिती कमी होते. त्यामुळे कोटीपोटातील सामूची पातळी कमी होऊन जनावरांना पित्ताचा त्रास होऊ शकतो.

Animal Feed Management
Animal Feed : दुधाळ जनावरांसाठी समतोल आहाराची गरज

आहारात फॅटचा वापर ः

१) मिथेनचे उत्पादन कमी करणे, रुमेनचे आरोग्य चांगले राखणे, ऊर्जेचा वापर आणि जनावरांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी आहारामध्ये आवश्यकतेनुसार फॅट समाविष्ट करणे आवश्यक आहे. मात्र, आहारात फॅटचा जास्त प्रमाणात समावेश केल्यास रुमेनमधील किण्वन प्रक्रियेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.

तसेच उपयुक्त सूक्ष्म जीवाणूंच्या वर आवरणे तयार होतात किंवा रुमेनमधील सूक्ष्मजीवांवर थेट विषारी प्रभावामुळे विपरीत परिणाम होऊ शकतो.

यामध्ये तंतुमय पदार्थांच्या पचनावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे जनावरांचे खाद्य सेवनाचे प्रमाण कमी होऊन उत्पादनात घट येते.

२) आहारात जास्त चरबीयुक्त पदार्थांच्या वापरामुळे पचनसंस्थेशी निगडित रक्तवाहिन्यांचा व हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो.

बफरचा वापर ः

दूध देणाऱ्या गायींमध्ये अधिक उत्पादन मिळविण्यासाठी पोषक घटकांनी युक्त आहारावर अधिक भर दिला जातो. अशा आहारात किण्वन प्रक्रिया अधिक जलद गतीने करण्यायोग्य स्टार्च जास्त असते. त्यामुळे कोटीपोटातील आम्लाची निर्मिती जलद गतीने होते.

तसेच आहारात तंतुमय पदार्थांचे प्रमाण कमी असल्याने रवंथ करण्याची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे लाळेचे उत्पादन कमी होऊन ऍसिडोसीस आजार होण्याची शक्यता वाढते.

जास्त दूध देणाऱ्या गायींच्या आहारात नियमितपणे बफरचा वापर करणे फायदेशीर ठरते. बफरची मात्रा ही पशुआहार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ठरवावी.

Animal Feed Management
Animal Feed : जनावरांना द्या संतुलित आहार

यीस्ट आणि विकरे (Enzymes) ः

१) यीस्ट कल्चर मधील सॅकारोमायसेस सेरेव्हिसीया (Saccharomyces cerevisiae) हे जठरातील पचन प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका निभवतात.

हे जठरातील अनावश्यक ऑक्सिजन शोषून घेतात. यीस्ट कल्चर हे जठराचा सामू नियंत्रित करतात. तसेच अन्न घटकांचे पचन सुधारण्यास मदत करतात.

२) जनावरांची पचनक्षमता वाढविण्यासाठी विकरांचा (एन्झाइम्स) वापर केला जातो. एन्झाइम्स मुळे पशू आहारातील स्टार्च, प्रथिने आणि फॅट यांचे पचन सुलभ होऊन पचनक्षमता सुधारते. त्यामुळे जनावरांचे आरोग्य चांगले राखले जाऊन दूध उत्पादनात वाढ होते.

जीवनसत्त्व आणि खनिज मिश्रणाचा वापर ः

जनावरांना हिरवा चारा, सुका चारा, पशुखाद्य यांचा योग्य मात्रेत वापर करणे आवश्यक आहे. पशुखाद्य आणि चारा यामध्ये वारंवार बदल करू नयेत. जनावरांच्या आरोग्यासाठी व दर्जेदार उत्पादनासाठी पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिज मिश्रणांचा वापर करावा.

पाणी ः

जनावरांना स्वच्छ आणि मुबलक पाण्याची उपलब्धता करावी. पाण्यातील हानिकारक घटक जनावरांच्या पचनक्रियेवर विपरीत परिणाम करतात. पाण्याची गुणवत्ता व पुरवठा योग्य नसले तर जठराचे कार्य बिघडते.

त्यामुळे शरीरास आवश्यक पोषक घटकांचे पचन व शोषण व्यवस्थित होत नाही. परिणामी उत्पादनात घट येते. बदलत्या हवामानानुसार व्यवस्थापनात योग्य बदल करणे आवश्यक आहे. तसेच वेळापत्रकानुसार लसीकरण, जंतनिर्मूलन करून जनावरांचे आरोग्य राखण्यास मदत होते.

डॉ. लिंबाजी अण्णा साळवे, ८३९०५८३९९९, ७०४३८५०५८५, (पशू आहारतज्ज्ञ, मुख्य कार्यकारी अधिकारी- किसान फीड्स, फलटण)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com