Rajma Cultivation : रब्बीत राजमा लागवडीकडे कल

रब्बीत आणि हरभरा हेच समीकरण सर्वत्र बनलेले आहे. मात्र, काही शेतकरी आता बदल करू लागले आहेत.
Rajma Cultivation
Rajma Cultivationagrowon

वाशीम ः रब्बीत आणि हरभरा (Chana) हेच समीकरण सर्वत्र बनलेले आहे. मात्र, काही शेतकरी (Farmer) आता बदल करू लागले आहेत. यंदाच्या हंगामात रब्बीमध्ये (Rabi Season) शेतकरी राजमा सारख्या नवख्या पिकाचा प्रयोग करण्यासाठी पुढे आले आहेत. जिल्ह्यात हंगामात किमान ३०० एकरांपर्यंत लागवड होण्याची शक्यता कृषी विभागाने (Agriculture Department) वर्तवली जात आहे.

Rajma Cultivation
Rabbi Sowing : रब्बी पेरणी का पडतेय लांबणीवर ? | ॲग्रोवन

जिल्ह्यात एकीकडे रब्बी लागवडीला वेग आला आहे. हरभरा लागवड सर्वाधिक होणार आहे. परंतु काही शेतकरी इतर पिकांचाही प्रयोग करू लागले. त्यामुळेच या हंगामात किमान २५० ते ३०० एकरांपर्यंत राजम्याची लागवड अपेक्षित धरली जात आहे. रिसोड तालुक्यात आतापर्यंत १०० एकरांपेक्षा अधिक लागवड झालेली आहे.

राजमा हे पीक हरभरा पिकाला उत्तम पर्याय ठरत असल्याचा अनुभव गेल्या हंगामात उत्पादन काढलेल्या शेतकऱ्यांकडून सांगितला जात आहे. रब्बीतील इतर पिकांपेक्षा बाजारभावही चांगला मिळत असल्यामुळे यावर्षी काही शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकाला फाटा देत या पिकाची लागवड केली आहे.

सध्या रब्बीची लगबग सुरू झाली आहे. रब्बीमध्ये जिल्ह्यात प्रामुख्याने हरभरा, गहू या पिकांसह काही क्षेत्रावर करडई, सूर्यफूल व इतर पिकांची लागवड होते. बहुतांश शेतकऱ्यांचा कल हरभरा लागवडीवरच आहे. मागील काही वर्षापासून हरभरा उत्पादनात सातत्याने घट येत आहे. मर रोगाचा प्रादुर्भाव कमालीचा वाढला.

Rajma Cultivation
Crop Damage Survey : मंगळवेढ्यात पीक नुकसानीच्या पंचनाम्याबाबत नव्याने आदेश

तसेच हरभऱ्याला बाजारात चार हजारांच्या जवळपास भाव मिळत असल्यामुळे खर्चही निघणे मुश्कील आहे. त्यामुळे शेतकरी पिकांची प्रायोगिक तत्त्वावर लागवड करण्यात रस दाखवत आहे. मागील वर्षापासून रिसोड तालुक्यात राजमा पिकाने शिरकाव केलेला आहे. राजमा आहे कडधान्यांमध्ये मोडणारे पीक आहे पोषणतत्त्वे तसेच कॅल्शिअमचे प्रमाण भरपूर आहे. उत्तरेकडील राज्यात राजमा दैनंदिन आहारात घेतल्या जातो. रब्बीमध्ये ७० ते ८० दिवसांमध्ये हे पीक तयार होत असून काही शेतकरी आठ ते १० क्विंटलपर्यंत उत्पादन घेतात. सध्या याचे बाजारमूल्य आठ हजारांवर पोचलेले आहे.

दरवर्षी एकच एक पीक घेतल्याने कीड-रोगांना पोषक परिस्थिती निर्माण होते. शिवाय बाजारभाव, उत्पादनासाठी लागणारा खर्च याचा ताळेबंद लक्षात घेत शेतकरी पीक बदलाकडे वळू लागले. जिल्ह्यात राजमा पिकाची २५० ते ३०० एकरांपर्यंत लागवड होऊ शकेल. राजमा हा आहारासाठी सकस असल्याने त्याला बाजारात मागणीसुद्धा राहते.

- शंकर तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशीम

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com