Mobile Ban : देगावात रोज सायंकाळी दोन तास टीव्ही, मोबाईल बंद

पंढरपूर तालुक्यातील सतत नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या देगाव ग्रामपंचायतीने अनोख्या प्रयोगांतर्गत आता गावात सायंकाळी सहा ते आठ या दरम्यान टीव्ही आणि मोबाईल बंदीची घोषणा केली आहे.
Mobile Ban
Mobile BanAgrowon

सोलापूर ः पंढरपूर तालुक्यातील सतत नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या देगाव ग्रामपंचायतीने (Degaon Gram Panchayat) अनोख्या प्रयोगांतर्गत आता गावात सायंकाळी सहा ते आठ या दरम्यान टीव्ही आणि मोबाईल बंदीची (Ban Tv, Mobile) घोषणा केली आहे.

या दोन तासांच्या वेळेत मुलांकडून केवळ अभ्यासच करून घेतला जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून देगावमध्ये हा नावीन्यपूर्ण उपक्रम अतिशय प्रभावीपणे राबविला जात आहे.

Mobile Ban
Agriculture Department : कृषी उपसंचालकांचे आंदोलन स्थगित

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिन जिल्हा परिषद शाळेत साजरा करत या नावीन्यपूर्ण उपक्रमाची घोषणा ग्रामपंचायतीने केली आहे. रोज सायंकाळी सहा ते आठ या दोन तासांच्या दरम्यान गावामध्ये सायरन वाजवला जातो.

त्यांनतर ग्रामपंचायतीमधील शिपाई दवंडी देऊन आवाहन करतात. गावातील सर्व घरामध्ये टीव्ही व मोबाईल दोन तास बंद ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. या कालावधीत पालकांनी विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घ्यावयाचा आहे.

Mobile Ban
Telangana Agriculture : शेतकऱ्यांना निविष्ठा खरेदीसाठी मदत करणारे तेलंगणा एकमेव राज्य : राव

देगावच्या सरपंच सीमा घाडगे, संजय घाडगे, ग्रामपंचायत सदस्य समीर शेख, समाधान घाडगे, जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश लेंडवे, मुख्याध्यापक कुलकर्णी, आप्पा ढेरे आदींनी हा निर्णय एका बैठकीत घेतला. त्याची पुरेपूर अंमलबजावणी सध्या सुरू आहे. त्याची चर्चा आता सगळीकडे सुरू आहे.

ग्रामपंचायतीची पाहणी अन् दंड वसुली

ठरलेल्या दोन तासांत घरोघरी जाऊन सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायतीमधील शिपाई पाहणी करतात. मुले अभ्यास करतात की नाही, घरातील टीव्ही बंद आहे का नाही, ग्रामपंचायतीने केलेल्या ठरावाची अंमलबजावणी होते की नाही, ज्यांच्याकडून होत नाही, त्यांच्याकडून एक हजार रुपयांचा दंडही ग्रामपंचायतीद्वारे आकारण्याचा निर्णय या वेळी झाला आहे.

विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी निर्णय

कोरोना काळामध्ये सरकारने ऑनलाइन शिक्षण पद्धती अवलंबली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून विद्यार्थ्यांच्या हातामध्ये स्मार्टफोन देऊन शिक्षण शिकवले जात होते. परंतु याचा विपरीत परिणाम सध्या विद्यार्थ्यांवर होऊ लागला होता.

मोबाईल व टीव्हीचा अतिरिक्त वापर होऊ लागल्याने विद्यार्थी पुस्तकाकडे दुर्लक्ष करू लागले आहेत. तसेच त्यांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सरपंच सीमा घाडगे यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com