Sugarcane Award : अनिता दळवी ठरल्या ‘ऊसभूषण’च्या मानकरी

अनिता दळवी यांची कामगिरी अत्यंत कौतुकास्पद असून बागलाण तालुक्याची राज्यस्तरावर मान उंचावणारी आहे.
Sugarcane Award
Sugarcane AwardAgrowon

अंतापूर, जि. नाशिक : केळझर (ता. सटाणा) या आदिवासी पश्चिम भागातील ऊस उत्पादक (Sugarcane Producer) अनिता दळवी यांना राज्यात सुरू हंगामात विक्रमी (Sugarcane Crushing) ऊस उत्पादन घेतल्याबद्दल ‘ऊस भूषण’ पुरस्कार (Sugarcane Award) प्रदान करण्यात आला.

२०२१-२२ या गळीत हंगामात दळवी यांनी एकरी विक्रमी ९४ टन उसाचे उत्पादन घेतल्यामुळे ऊस व साखर उद्योगाची अग्रणी संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी बुद्रुक, पुणेतर्फे दिला जाणारा मानाचा ‘ऊस भूषण’ पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संस्थेचे अध्यक्ष शरद पवार व महाराष्ट्र राज्यातील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.

स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व रोख बक्षीस असे पुरस्काराचे स्वरूप आहे. देऊन गौरवण्यात आले. या वेळी सुनील दळवी, भीमराव दळवी, धवळीबाई दळवी, बुद्धा ठाकरे, सागर देशमुख, ऊस विकास अधिकारी बाळासाहेब करपे, सतीश सोनवणे, हेमंत खैरनार, महेंद्र देवरे उपस्थित होते.

द्वारकाधीश कारखान्याचे उपाध्यक्ष चंद्रकला सावंत, संचालक सचिन सावंत, कार्यकारी संचालक कैलास सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी भालेराव, शेतकी अधिकारी विजय पगार यांच्यासह ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दळवी यांचे अभिनंदन केले.

Sugarcane Award
Sugarcane Cultivation : सांगलीत ६९ हजार हेक्टरवर ऊस लागवड
अनिता दळवी यांची कामगिरी अत्यंत कौतुकास्पद असून बागलाण तालुक्याची राज्यस्तरावर मान उंचावणारी आहे. कारखान्यातर्फे ‘एकरी १०० टनांकडे झेप’ या योजनेअंतर्गत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना निविष्ठा स्वरूपात बिनव्याजी पुरवठा करण्यात येत असून या योजनेचा जास्तीत जास्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.
शंकरराव सावंत, अध्यक्ष द्वारकाधीश कारखाना लिमिटेड, शेवरे

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com