Millet Diet : आहारात तृणधान्य वापरणे काळाची गरज

"सध्या फास्ट फूडचा जमाना असल्याने तृणधान्याला महत्त्व दिले जात नाही. तृणधान्यात भात, ज्वारी, बाजरी, राजगिरा, राळा, वरई, नाचणी या पिकांचा समावेश होतो. मुख्य अन्नाच्या तुलनेत जास्त फायबर देणारे हे अन्न आहे."
Millet Products
Millet ProductsAgrowon

बार्शी ः ‘‘आपण आपले धान्य विसरून पाश्‍चात्त्य धान्यांच्या मागे लागून विविध आजारांना बळी पडत आहोत. यापासून मुक्तता मिळवायची असेल, तर तृणधान्यांशिवाय (Cereal) पर्याय नाही. हे सत्य जगाने ओळखले."

"त्यामुळे जगातील विविध देशांमध्ये तृणधान्याचा वापर वाढला आहे. तृणधान्याचे आहारातील महत्त्व जाणून घेऊन दैनंदिन आहारामध्ये त्यांचा समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे,’’ असे आवाहन कृषी पर्यवेक्षक (Agricultural Supervisor) सयाजीराव गायकवाड यांनी केले.

कृषी विभागाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी शहाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३’ म्हणून साजरे केले जात आहे. त्यानुसार भानसळे येथे कृषी सहायक प्रतिमा इंगळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

गायकवाड म्हणाले, ‘‘ सध्या फास्ट फूडचा जमाना असल्याने तृणधान्याला महत्त्व दिले जात नाही. तृणधान्यात भात, ज्वारी, बाजरी, राजगिरा, राळा, वरई, नाचणी या पिकांचा समावेश होतो. मुख्य अन्नाच्या तुलनेत जास्त फायबर देणारे हे अन्न आहे.

भारतीयांचे प्रमुख अन्न म्हणून तृणधान्ये ओळखली जात होती. परंतु काही वर्षांपासून त्यात घट होत आहे. या धान्यांच्या पिकांची वाढ कोरडवाहू, बागायतीत होते.’’

Millet Products
Cereal Crop : पौष्टिक तृणधान्य क्रांतीसाठी...

महिलांनी जाणली बाजरीची रेसिपी

उपस्थित महिलांना भोगीनिमित्त बाजरीचे महत्त्व व बाजरी विषयीच्या विविध रेसिपींची माहिती इंगळे यांनी दिली.

या वेळी डॉ. वैभवी गायकवाड, डॉ. आश्‍विनी आकळे यांनी मार्गदर्शन केले. गावच्या सरपंच शकुंतला धन्यकुमार हिरे महिला बचत गटप्रमुख मनीषा कदम आणि सर्व गटातील महिला उपस्थित होत्या तसेच माजी सरपंच माणिक पाटील प्रगतिशील शेतकरी धन्यकुमार हिरे धारलिंग हिरे संतोष हिरे प्रवीण पाटील, असे सर्व शेतकरी बंधू उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com