Vel Amavasya : शेतकरी कुटुंबांकडून उत्साहात वेळा-अमावस्या साजरी

उस्मानाबाद : शेतातील उत्पन्नातून समृद्धी व भरभराट व्हावी, अशी मनोकामना करत शेतकरी कुटुंबांनी शुक्रवारी (ता.२३) वेळा-अमावस्या उत्साहात साजरी केली.या वेळी काळ्याआईची मनोभावे पूजा करण्यात आली.
Vel Amavasya
Vel AmavasyaAgrowon

उमरगा, जि. उस्मानाबाद : शेतातील उत्पन्नातून (Agriculture Income) समृद्धी व भरभराट व्हावी, अशी मनोकामना करत शेतकरी कुटुंबांनी शुक्रवारी (ता.२३) वेळा-अमावस्या (Vel Amavasya) उत्साहात साजरी केली.या वेळी काळ्याआईची मनोभावे पूजा करण्यात आली.

Vel Amavasya
Agriculture Export : शेतीमालाची निर्यात जलदगतीने करणार : गडकरी

दरम्यान यंदा रब्बीच्या पेरण्याला थोडा उशिरा झालेला असला तरी पाण्याच्या उपलब्धतेमुळे पिकांचा बहार वाढला आहे. दुपारी साडेबारानंतर शेतकऱ्यांनी नातेवाईक मित्रपरिवारासह वन भोजनाचा आनंद घेतला. शेतकरी कुटुंबासाठी वेळा-अमावस्याचा सण म्हणजे आनंद, उत्साहाची पर्वणीच असते. यंदा परतीच्या पावसा दरम्यान अतिवृष्टीने शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडविली. परिणामी रब्बीची पेरणी उशिरा झाली.

सध्या काही शिवारात ओलिताखालील पिके बहरात आली आहेत. पिकांवरील कीड, अळीचे विघ्न दूर करण्याचा खटापोट शेतकऱ्यांना करावा लागतोय. वेळा-अमावस्या असल्याने शेत- शिवार गजबजलेली दिसून आली. अनेक शेतकरी कुटुंबांनी बैलगाडीतून वेळ-अमावस्येला शेतात जाण्याची प्रथा कायम ठेवली आहे.

Vel Amavasya
Vel Amavasya : मराठवाड्यातील वेळ अमावस्येचे महत्व

दुचाकी, चारचाकी व ट्रॅक्टरमधूनही शेताकडे शेतकरी कुटुंब जात असल्याचे चित्र दिसून आले. दुपारी बारानंतर शेतकरी कुटुंबांनी पाच पांडवांची विधीवत पूजा केली. त्यानंतर शेतातील ज्वारी, हरभरा पिकावर अंबिल शिंपडण्यात आले. ज्वारी, हरभरा, गहू, करडई पिकाच्या हिरवाईत बच्चे कंपनीने मनसोक्त खेळाचा आनंद घेतला. कडवट- आंबट बोरं, हिरव्या चिंचा आणि मधमाश्यांनी संकलित केलेल्या मकरंदाचा आस्वाद चिमुकल्यांनी घेतला.

वन भोजनाचा घेतला आस्वाद

बाजरीपासून बनविलेले उंडे, बाजरी व ज्वारीच्या कडक भाकरी तसेच सर्व प्रकारच्या पालेभाज्या, वटाणा, हरभऱ्याचे हिरवे दाणे, बेसन यापासून बनविलेली भाजी (भज्जी), वांगे, कांद्याची पात व हिरव्या मिरच्यांपासून तयार केलेले भरीत, गव्हाची खीर, कोंदीच्या गोड पोळ्या, आंबट भात (खिचडा) या विविध पदार्थांसह अंबिलाचा घोट घेत शेतकरी कुटुंबांनी वनभोजनाचा आस्वाद घेतला.

सीमावर्ती भागांतही उत्साह

उमरगा तालुका कर्नाटक राज्याच्या सीमेलगत असल्याने बहुतांश सण- उत्सव जवळपास एकसारखे असतात. महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगतच्या कर्नाटकातील बहुतांश गावात वेळा-अमावस्या उत्साहात साजरी करण्यात आली. खजुरी, धमुरी, उजळंब, एकंबा, आणूर, होदलूर, आळंगा, लाडवंती, नंदगुर, रूद्रवाडी, जामगा, हत्तरगा, हिप्परगा आदी भागांत उत्साह पाहायला मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com