Gram Panchayat Election : वडाळीत ग्रामपंचायत प्रशासन आपल्या दारी

वडाळी (ता. शहादा) गावातील समस्या, प्रश्‍न निवारणासाठी वडाळी ग्रामपंचायतीने नगरसेवक आपल्या दारीच्या धर्तीवर ग्रामपंचायत प्रशासन आपल्या दारी हा उपक्रम हाती घेतला आहे.
Gram Panchayat Election
Gram Panchayat ElectionAgrowon

वडाळी, जि. नंदुरबार ः वडाळी (ता. शहादा) गावातील समस्या, प्रश्‍न निवारणासाठी वडाळी ग्रामपंचायतीने नगरसेवक आपल्या दारीच्या धर्तीवर ग्रामपंचायत प्रशासन (Gram Panchayat Election ) आपल्या दारी हा उपक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत गावातील प्रत्येक प्रभागात जाऊन ग्रामस्थांच्या समस्या ऐकल्या जाणार आहेत. कदाचित असा उपक्रम राबविणारी वडाळी ही जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत असेल. यामुळे ग्रामस्थांच्या समस्या सुटणार आहेत.

Gram Panchayat Election
Gram Panchayat Election : नगर जिल्ह्यात सरपंच पदांसाठी १२८२ अर्ज

ग्रामसभा सुरू होण्याआधी तासभर पहिले प्रभागातील घराघरांत प्रत्यक्ष भेटी देऊन सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी व त्या त्या प्रभागातील लोकप्रतिनिधी, कर्मचारी उपस्थित राहून समस्यांची पाहणी करून नियोजन केले जाणार आहे. या अनोख्या ग्रामसभेत लोकनियुक्त सरपंच जयाबाई ठाकरे, उपसरपंच अभय गोसावी, ग्रामविकास अधिकारी बी. बी. देसले, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ग्रामस्थांनी एकत्रित येऊन त्यांच्या समस्या, गरजा थेट संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कानी टाकता येणार आहेत.

ग्रामसभेला आरोग्य, शिक्षण, कृषी, पशुसंवर्धन, बँकिंग, बालविकास प्रकल्प, महिला बचत गटातील सदस्य, अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत त्या त्या विभागातील समस्या सोडविण्यात येणार आहेत. ग्रामसभेला उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.

ग्रामपंचायत प्रशासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत प्रत्येक प्रभागात आठवड्याच्या सोमवारी व शुक्रवारी जाऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेणार आहोत. या समस्या सोडविण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीमार्फत केला जाणार असून, यामुळे गावविकासाला चालना मिळेल. यातून गावाचा एकोपा टिकून राहील.

-अभय गोसावी, उपसरपंच, वडाळी (जि. नंदुरबार)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com