Sugar Factory Election : भीमा साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज मतदान

टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी जोरात झाली. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीने प्रचारात चांगलाच धुरळा उडला.
Sugar Factory Election
Sugar Factory ElectionAgrowon

सोलापूर ः टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी (Sugar Factory Election) प्रचाराची रणधुमाळी जोरात झाली. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीने प्रचारात चांगलाच धुरळा उडला.

Sugar Factory Election
Sugar Export: महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांसाठी गोड बातमी

आता उद्या रविवारी (ता.१३) मतदान होणार असून, सोमवारी (ता. १४) मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. कारखान्याचे विद्यमान चेअरमन आणि खासदार धनंजय महाडीक विरुद्ध माजी आमदार राजन पाटील, प्रशांत परिचारक यांच्या दोन्ही पॅनेलमध्ये ही निवडणूक होत आहे. त्यामुळे यात कोण बाजी मारणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

खासदार महाडीक यांचे भीमा शेतकरी विकास आघाडी विरुद्ध माजी आमदार पाटील-परिचारक यांचे भीमा बचाव परिवर्तन पॅनेल या दोन पॅनेलमध्ये ही निवडणूक लागली आहे. गेल्या पंधरवड्यापासून प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे.

Sugar Factory Election
Crop Damage Survey : ‘पंचनामे राहिलेल्या शेतकऱ्यांनो संपर्क साधा’

खासदार महाडीक यांना विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील, माजी अध्यक्ष भगिरथ भालके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसकर, माजी सभापती विजयराज डोंगरे यांनी पाठिंबा देत स्वतः प्रचारात उतरत चांगलीच रंगत आणली आहे.

दुसरीकडे पाटील-परिचारक यांच्या प्रचारात स्वतः परिचारक, पाटील यांच्यासह उमेश परिचारक, माजी आमदार पाटील यांचे चिरंजीव बाळराजे पाटील आणि अंजिक्यराणा पाटील हे उतरले आहेत. दोन्ही बाजूंनी प्रचारात चांगलेच घमासान रंगले. भीमा कारखान्यावर महाडीक यांची गेली दहा वर्षे सत्ता आहे.

यंदा महाडीक यांनी स्वतःसह त्यांचे चिरंजीव विश्‍वराज यांनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. आता पुन्हा एकदा महाडीक हॅटट्रिक साधणार की पाटील-परिचारक पुन्हा कारखान्यात प्रवेश करणार, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

मतदारांचा कौल कुणाला?

कारखान्यावरील थकीत कर्ज, कामगारांच्या पगारी, काटामारी, ऊसदर यासारख्या प्रश्नासह आरोप-प्रत्यारोपाने दोन्ही बाजूंनी प्रचार चांगलाच शिगेला पोचला. अगदी वैयक्तिक पातळीपर्यंतही प्रचार आल्याने मोहोळ-पंढरपूर हे दोन्ही तालुके पुरते ढवळून निघाले. या सगळ्यात आता कौल कोणाच्या पारड्यात जाणार, हे सोमवारी (ता.१४) स्पष्ट होणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com