
सांगली : जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जत तालुका पूर्व भागातील नागरिकांची मोठी अडचण ठरत आहे. जतपासून (Jat Taluka Division) दूरचे अंतर आणि विकासाच्या मुद्दांवर या तालुक्याच्या विभाजनाची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. संखला तहसील कार्यालय (Tehsil Office) दिले, इतर विभाग मात्र जतला ठेवल्याने ‘सरकारी काम आणि डोक्याला बाम’ अशी अवस्था जतकरांची झाली आहे.
जिल्ह्यात विस्ताराने सर्वात मोठा तालुका जत असून एकूण क्षेत्र दोन लाख २४ हजार ५३८ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. तालुक्यात १२५ गावे २७६ वाड्या-वस्त्या आहेत. जत शहरापासून पूर्व भागातील सुसलाद, उमदी, हळ्ळी ही गावे तब्बल ७० ते ८० किलोमीटरवर आहेत. त्यामुळे या भागातील गावकऱ्यांना शासकीय कामांसाठी जत शहरातच यावे लागते. मात्र या ठिकाणी एका हेलपाट्यात कामे होतच नाहीत, यामुळे केवळ मनस्तापाशिवाय हाती काहीच लागत नाही, अशी अवस्था आहे.
वीस वर्षांपूर्वी कडेगावाची दहावा तालुका म्हणून जिल्ह्यात निर्मिती करण्यात आली. यानंतर जत तालुक्याचे विभाजनाचा मुद्दा पुढे आला. विभाजनाच्या रेट्यामुळे पूर्व भागात पाच ते सहा वर्षांपूर्वी संख येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू केले. परंतु हे कार्यालय असून, खोळंबा नसून अडचणी अशी स्थिती आहे.
या ठिकाणी ना कृषी कार्यालय, ना आरोग्य, ना इतर कोणत्याही विभागाचे कार्यालय आहेत. केवळ महसूल विभागाचे कामकाज चालते. परंतु महसूल विभागाचे अधिकारीदेखील इथे दररोज येत नाहीत, अशी तक्रार गावकऱ्यांनी मांडली आहे. त्यामुळे महसूल विभागासह इतर विभागाची कार्यालये झाली असती, तर गावकऱ्यांना ७० ते ८० किलोमीटरचा प्रवास करून जत येथे जावे लागले नसते.
अप्पर तहसील कार्यालयाऐवजी तालुक्याचेच विभाजन करा अशी मागणी आता जोर धरू लागलीय. तालुका विभाजन झाला, तर नक्की मूलभूत सोयी-सुविधा मिळतील अशी आशा आजही इथल्या ग्रामस्थांत आहे. तालुका विभाजनाच्या प्रश्नाचे घोंगडे तीन वर्षापासून भिजत पडले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.