Wild Boar : रानडुकरे करताहेत रब्बी पिके फस्त

म्हसदी व परिसरात हा उपद्रव रानडुकरे घालत आहेत. घुबड्या शिवारातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील काढणीवर आलेले हरभरा पीक‌ रानडुकरांनी फस्त केले.
Wild Boar
Wild BoarAgrowon

Dhule News म्हसदी, जि. धुळे : वन्यपशू बिबट्याच्या (Leopard Terror) धुमाकुळीनंतर रानडुकरांच्या उपद्रवामुळे (Wild Boar Rampage) म्हसदीसह परिसरातील शेतकरी हतबल झाला आहे. काढणीवर आलेला हरभरा (Chana), कांद्यासारख्या पिकांचे रानडुकरांकडून अतोनात नुकसान (Onion Crop Damage) होत आहे.

म्हसदी व परिसरात हा उपद्रव रानडुकरे घालत आहेत. घुबड्या शिवारातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील काढणीवर आलेले हरभरा पीक‌ रानडुकरांनी फस्त केले.

शेतकऱ्यांनी वन विभागास माहिती दिल्यावर वन कर्मचारी रमेश बच्छाव, एकनाथ गायकवाड, पंडित खैरनार, नितीन भदाणे यांनी पंचनामा केला.

Wild Boar
Wild Animal Rampage : वन्यप्राण्यांकडून नुकसानीबाबत सकारात्मक निर्णय घ्या

रब्बी हंगामातील गहू, हरभरा पीक‌ काढणीवर आले आहे. तथापि, पेरणी झाल्यापासून वनक्षेत्राला लागून असलेल्या शेतशिवारात रानडुकरांचा त्रास असतो. अशा ठिकाणी पीक निघेपर्यंत शेतकरी ‘देव पाण्यात टाकून’ उत्पन्न घरी येण्याची प्रतीक्षा करतात.

यंदा मुबलक पाण्यामुळे रब्बी पेरणीची वाढ झाली आहे. दुसरीकडे उन्हाळ कांदा लागवड वाढली आहे. शेतात लागवड, पेरणी झालेले प्रत्येक पीक रानडुकरे फस्त करत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Wild Boar
Wild Animal Rampage : रब्बी पिके वन्यप्राण्यांच्या कचाट्यात

रानडुकरे असतात कळपाने

साक्री तालुक्यात म्हसदी ते शेंदवड मांजरीपर्यंत मोठे वनक्षेत्र आहे. सुरक्षित वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात रानडुकरे असल्याचे वन कर्मचारीच सांगतात. सध्याच्या परिस्थितीत नैसर्गिक आपत्तीनंतर रानडुकरांचा त्रास असल्याचे शेतकरी सांगतात.

यंदा म्हसदीसह लगतच्या परिसरातील सर्व शिवारात बिबट्याच्या धुमाकुळीनंतर रानडुकरांनी शेतकऱ्यांना शेती करावी की नाही, हा प्रश्‍न उपस्थित केला आहे. रानडुकरे कळपाने शेतात दाखल होतात.

अशा वेळी एकटा-दुकटा शेतकरी रानडुकरांना प्रतिबंध करू शकत नाही. समजा तसा प्रयत्न केला, तर रानडुकरे शेतकऱ्यांवर प्रतिहल्ला करण्याचे धाडस करत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वन विभागाने पंचनामा करून भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्याने केली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com