Crop Damage : दिवाळी साजरी न करता नुकसानीची पाहणी करणार : विखे पाटील

राज्यभरातील बळिराजा अस्मानी संकटात सापडला असताना आम्ही दिवाळी साजरी करू शकत नाही. पुढील चार दिवस आपण स्वतः जिल्हाभर फिरून शेतकऱ्यांना आधार देणार आहोत.
Radhakrushna Vikhe Patil
Radhakrushna Vikhe PatilAgrowon

नगर ः राज्यभरातील बळिराजा अस्मानी संकटात सापडला असताना आम्ही दिवाळी साजरी करू शकत नाही. पुढील चार दिवस आपण स्वतः जिल्हाभर फिरून शेतकऱ्यांना आधार देणार आहोत. पिकांचे सरसकट पंचनामे, (Crop Damage) यापूर्वीची भरपाई (Crop Insurance) रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश आपण दिले.

Radhakrushna Vikhe Patil
Crop Damage : आम्ही तुमच्या पाठीशी आहोत

पुढील चार दिवस सरकारी यंत्रणा बांधावर जाऊन काम करेल. शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार भक्कमपणे उभे राहील, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल (शनिवारी) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शिर्डीतून नगर जिल्ह्यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना शेतकऱ्यांच्या मदतीसाठी युद्धपातळीवर काम करण्याच्या सूचना दिल्या.

Radhakrushna Vikhe Patil
Paddy Crop Damage : कापलेल्या भातपिकाच्या नुकसानीची भीती

नगर येथून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप, शिर्डी येथून अपर जिल्हाधिकारी सोनप्पा यमगर, शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोरोळे आदी उपस्थित होते.

विखे पाटील म्हणाले, की राज्यात व नगर जिल्ह्यात पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहे. पुढील चार दिवसांत जिल्हाभरातील पंचनामे पूर्ण होतील. शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. आपण स्वतः त्यासाठी पाठपुरावा करत आहे. शेतकऱ्यांच्या घरी दिवाळी नाही, तर मीही दिवाळी साजरी करणार नाही. चार दिवस जिल्हाभर फिरून नुकसानीची पाहणी करणार आहे. नगर जिल्ह्यात चार लाख ९० हजार ६८५ आनंदाचा शिधा किट प्राप्त झाल्या आहेत.

पिकांचे सरसकट पंचनामे, यापूर्वीची भरपाई रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश आपण दिले आहेत. शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी सरकार कटिबद्ध आहे. शेतकरी हितासाठीच आम्ही काम करत आहोत.

- राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री तथा महसूलमंत्री

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com