परभणीत काकडी ८०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल

cucumber 800 to 1500 rupees per quintal in Parbhani
cucumber 800 to 1500 rupees per quintal in Parbhani

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. ३) काकडीची ४० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटलला ८०० ते १५०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

गवारीची १५ क्विंटल आवक होती. तिला ३००० ते ४००० रुपये दर मिळाले. वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडक्याची ८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. कारल्याची १५ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटलला २००० ते २५०० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची २५ क्विंटलला आवक झाली. प्रतिक्विंटलला ५०० ते १००० रुपये दर मिळाले.

पालेभाज्यांमध्ये मेथीच्या २५ हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा १५० ते २००० रुपये दर मिळाले. पालकाची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ५०० ते ८०० रुपये दर मिळाले. शेपूची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ७०० ते १००० रुपये दर मिळाले.

चुक्याची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची ८० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ७०० ते १५०० रुपये दर मिळाले. शेंगवर्गीय भाज्यामध्ये वाटण्याची ७० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १८०० ते २५०० रुपये दर मिळाले. चवळीची ४ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटलला ३००० ते ४००० रुपये दर मिळाले. वालाची ३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १२०० ते २००० रुये दर मिळाले. पातीच्या कांद्याची ८ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटलला २००० ते २५०० रुपये दर मिळाले.

वांग्याची ३५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ७०० ते १५०० रुपये दर मिळाले. टोमॅटोची ८०० क्रेट आवक असताना प्रतिक्रेटला १२५ ते २२५ रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची ६० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १२०० ते २००० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १५०० ते २००० रुपये दर मिळाले. फ्लॅावरची ६० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १२०० ते २००० रुपये दर मिळाले. कोबीची ४० क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटलला १००० ते १५०० रुपये मिळाले. भेंडीची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १८०० ते २००० रुपये दर मिळाले.

लिंबांना ४०० ते ८०० रुपये

लिंबांची ३० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ४०० ते ८०० रुपये दर मिळाले. बीटरूटची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विटंलला १५०० ते २००० रुपये दर मिळाले. गाजराची २०० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटलला ७०० ते १५०० रुपये दर मिळाले. मक्याची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १००० ते १५०० रुपये दर मिळाले. ताज्या बाजार भावासाठी क्लिक करा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com