नागपूरला सोयाबीन दरात सुधारण्याचा अंदाज

Estimates to improve soybean rates in Nagpur
Estimates to improve soybean rates in Nagpur

नागपूर : बाजारात उशिरा येणाऱ्या सोयाबीनची प्रत चांगली नाही. परिणामी लवकर येणारे सोयाबीन बियाणेकामी वापरता येणार आहेत. त्याला वाढीव दर मिळत असल्याचे चित्र बाजारात अनुभवता येण्यासारखे आहे. दुय्यम प्रतीच्या सोयाबीनला ४००० ते ४१०० रुपये क्‍विंटलचा दर असताना चांगल्या प्रतीच्या सोयाबीनचे व्यवहार ४२००  ते ४३०० रुपये क्‍विंटलने होत आहेत. 

कळमणा बाजार समितीत सोयाबीनची आवक १००० क्‍विंटलच्या घरात आहे. गेल्या आठवड्यात ही आवक अवघी २४२ क्‍विंटल इतकी अत्यल्प होती. गेला आठवड्यात सोयाबीनला ४००० ते ४२८० रुपयांचा दर मिळाला. त्यानंतरच्या काळात दर ४१०० रुपयांवरही पोचले. सद्यःस्थितीत सोयाबीनची आवक वाढण्यासोबतच दरातही तेजी अनुभवली जात आहे. १००० क्‍विंटलची सरासरी आवक तर दर ३७०० ते ४३१६ रुपयांवर पोचले होते. बियाणेकामी असलेल्या सोयाबीनलादेखील चढे दर असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. 

मध्य प्रदेशात संततधार पावसाचा सोयाबीनला फटका बसला. त्यामुळेदेखील दरात तेजी आल्याचे सांगण्यात येते. मध्य प्रदेशातील बाजारपेठेत बियाणेकामी असलेल्या चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला ४४०० रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे. हरभरा गेल्या आठवड्यात ३८०० ते ४२३० रुपये क्‍विंटल, तर या आठवड्यात ३६५० ते ४००० रुपये होता. हरभरा आवक जेमतेम ६० क्‍विंटलची आहे. गव्हाचे दर २१०० ते २२२६ रुपये क्‍विंटल आहेत. आवक १५० क्‍विंटलची झाली. सरबती गव्हाचे दर २५०० ते २७०० रुपये क्‍विंटल असून, आवक ३० क्‍विंटलची होती.

तांदळाचीदेखील बाजारात नियमित आवक असून, ४५०० ते ४८०० रुपये क्‍विंटलने तांदळाचे व्यवहार होत आहेत. तांदळाची आवक जेमतेम पाच क्‍विंटलची असल्याचे सांगण्यात आले. 

भुईमूग शेंगांची आवक १५० क्‍विंटल आणि दर ३२०० ते ३६०० रुपयांप्रमाणे होते. संत्रा ८०० ते ३१०० रुपये क्‍विंटल आणि आवक ११३ क्‍विंटल इतकी होती. बाजारातील मोसंबीचे दर १४०० ते १८०० रुपये आहेत.

द्राक्षांना ४००० ते ५५०० रुपये दर

 द्राक्षाचे दर ४००० ते ५५०० रुपये क्‍विंटल आणि आवक २०१ क्‍विंटलची होती. डाळिंब आवक १२५८ क्‍विंटल आणि दर १५०० ते ६००० रुपये. बाजारात पांढरा कांदा १५०० ते ४००० आणि आवक ९३५ क्‍विंटलची होती. टोमॅटो ८०० ते १००० रुपये क्‍विंटल आणि आवक १२० क्विंटलची होती. यापुढील काळात सोयाबीनमध्ये सुधारणा राहण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com