राज्यात द्राक्ष प्रतिक्विंटल १५०० ते १०००० रुपये

grapes 1500 to 10000 per quintal In the state
grapes 1500 to 10000 per quintal In the state

परभणीत ५४०० ते ७००० रुपये

परभणी येथील पाथरी रस्त्यावरील फळे -भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. १६) द्राक्षांची १ क्विंटल आवक होती. द्राक्षांना प्रतिक्विंटल ५४०० ते ७००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

येथील मार्केटमध्ये गेल्या आठवड्यापासून सोलापूर जिल्ह्यातून द्राक्षांची आवक होत आहे. गेल्या गुरुवारी (ता. ९) द्राक्षांची १८ क्विंटल आवक होती. त्या वेळी प्रतिक्विंटलला ६००० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. १६) द्राक्षांची ४१ क्विंटल आवक झाली. त्या वेळी घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटलला ५४०० ते ७००० रुपये होते. तर किरकोळ विक्री १०० ते १२० रुपये प्रतिकिलो दराने सुरू होती, असे व्यापारी महंमद अली यांनी सांगितले.

पुण्यात प्रति दहा किलोस ५५० ते १००० रुपये 

पुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १६) विविध वाणांच्या द्राक्षांची सुमारे २ टन आवक झाली. विविध द्राक्षांना १० किलोला सरासरी ५५० ते १००० रुपये दर मिळाला. सध्या ही आवक बारामती आणि सांगली जिल्‍ह्यातून होत असून, रविवार (ता. १९) पासून सुरळीत हंगाम सुरू होऊन नियमित रोज सुमारे ८ ते १० टनांची आवक होईल, असा अंदाज अडते अरविंद मोरे यांनी व्यक्त केला. 

विविध द्राक्षांचे दर 

जम्बो १० किलो  ६०० ते १००० 
सोनाका १५ किलो ७००-१२०० 
ताश ए गणेश १५ किलो ५५० ते ८००

जळगावात ४५०० ते १०००० रुपये दर जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये द्राक्षांची आवक सुरू आहे. ती रखडत होत आहे. गुरुवारी (ता. १६) आठ  क्विंटल द्राक्षांची आवक झाली. दर प्रतिक्विंटल ४५०० ते १०००० रुपये, असा मिळाला. आवक नाशिक, पश्‍चिम महाराष्ट्रातून होत आहे. सध्या हंगामाची सुरुवात असून, दर टिकून असल्याची माहिती मिळाली. मागील महिन्यात अपवाद वगळता कुठलीही आवक झाली नाही, असे सांगण्यात आले. 

अकोल्यात ३५०० ते ४५०० रुपये अकोला : सध्या थंडीचा कालावधी सुरू असल्याने बाजारात द्राक्षांची जेमतेम आवक होत आहे. सध्या येथे काळ्या द्राक्षाला ३५०० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान भाव मिळत, असल्याचे व्यापारी सूत्राने सांगितले. या भागात नाशिक, पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातून द्राक्षाची आवक होत आहे. सध्या काळया द्राक्षाची अल्पशी आवक सुरू झाली आहे. आठवड्यातून दोन ते तीन गाड्या द्राक्ष येत आहेत. थंडीमुळे ग्राहकांकडून तितकी मागणी नाही. परिणामी, दर ३५०० पासून ते ४५०० पर्यंत मिळत आहेत. या द्राक्षांची किरकोळ विक्री ८० ते ९० रुपये प्रतिकिलो दराने होत आहे. अत्यंत कमी आवक असलेली हिरवी द्राक्षे १०० रुपयांपेक्षा अधिक प्रतिकिलो दराने विकत आहेत. द्राक्ष हंगाम सुरू व्हायला आणखी महिनाभराचा कालावधी लागू शकतो, असेही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

सोलापुरात चार किलोस १०० रुपये  सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात द्राक्षाची आवक जेमतेम राहिली. पण मागणी असल्याने दरातील तेजी टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. द्राक्षाच्या चार किलोच्या पेटीला सर्वाधिक १०० रुपये इतका दर मिळाला. बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात द्राक्षांची आवक रोज ३०० ते ५०० पेट्यांपर्यंत राहिली. गेल्या महिनाभरापासून द्राक्षाची आवक बाजारात सुरू झाली आहे. ही सर्व आवक स्थानिक भागातूनच बार्शी, पंढरपूर, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर भागातून झाली. या सप्ताहात प्रतिदिन ५०० पेट्यांपर्यंत आवक राहिली. चार किलोच्या पेटीला किमान ५० रुपये, सरासरी ८० रुपये आणि सर्वाधिक १०० रुपये असा दर मिळाला. 

या आधीच्या सप्ताहात हीच आवक रोज २०० ते ३०० पेट्यांपर्यंत राहिली. तर, दर प्रति चार किलोच्या पेटीला किमान ४० रुपये, सरासरी ७५ रुपये आणि सर्वाधिक ११० रुपये दर मिळाला. त्या आधीही आवक ४०० ते ५०० पेट्या अशीच राहिली. तर प्रतिपेटीचा दर किमान ५० रुपये, सरासरी ८० रुपये आणि सर्वाधिक १०० रुपये असा दर मिळाला. बाजारातील द्राक्षाची आवक आणि दराची स्थिती किरकोळ चढउतार वगळता साधारण राहिल्याचे चित्र आहे.

नगरमध्ये प्रति दहा किलो ४०० ते ७०० रुपये

 नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत दहा किलोच्या ५ पेटी द्राक्षाची आवक झाली. दहा किलो पेटीच्या द्राक्षाला चारशे ते सातशे व सरासरी ५०० रुपयांचा दर मिळाला. नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत द्राक्षाची आवक सुरू झाली आहे. १० जानेवारी रोजी १८ पेटींची आवक होऊन पेटीला २५० ते ६०० व सरासरी ४५० रुपयांचा दर मिळाला. ३ जानेवारी रोजी ५ पेटीची आवक होऊन दहा किलोला ३०० ते ६०० व सरासरी ४५० रुपयांचा दर मिळाला. २६ डिसेंबरला ५ पेटीची आवक झाली. दहा किलोला ५०० रुपयांचा दर मिळाला. २२ डिसेंबरला ६ पेटींची आवक होऊन दहा किलोला २०० ते ५०० सरासरी तीनशे रुपयांचा दर मिळाला. नगर बाजार समितीत द्राक्षाची आवक वाढणार, असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

औरंगाबादमध्ये प्रतिक्‍विंटल ४००० ते ८००० रुपये 

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.१६) द्राक्षांची ९ क्‍विंटल आवक झाली. त्यांना ४००० ते ८००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची, माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली. औरंगाबाद बाजार समितीमध्ये सद्यःस्थितीत नगर, नाशिक जिल्ह्यातून द्राक्षाची आवक होत आहे. ७ जानेवारीला १४ क्‍विंटल आवक झालेल्या द्राक्षाला ६००० ते ६५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ८ जानेवारीला द्राक्षाची आवक ९ क्‍विंटल, तर दर ५००० ते ७५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ९ जानेवारीला १३ क्‍विंटल आवक झाली. दर ५००० ते ६००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ११ जानेवारीला १५ क्‍विंटल आवक झालेल्या द्राक्षाला ४००० ते ५५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

१२ जानेवारीला १३ क्‍विंटल आवक झालेल्या द्राक्षाचे दर ३५०० ते ५५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १३ जानेवारीला १५ क्‍विंटल आवक झाली. दर ६००० ते ८००० रुपये प्रतिक्‍विंटलचा मिळाला. १४ जानेवारीला द्राक्षांची आवक ७ क्‍विंटल, तर दर ५००० ते ८००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १५ जानेवारीला २२ क्‍विंटल आवक झाली. त्या वेळी ५००० ते ९००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

नाशिकमध्ये प्रतिकिलो १५ ते ५० रुपयांचा दर

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार बाजार समितीमध्ये द्राक्षांची आवक अतिशय कमी आहे. दररोज अडीच क्विंटलपर्यंत आवक होत आहे. येणारा माल हा दुय्यम दर्जाचा असल्याने त्यास कमी दर मिळत असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाल्याने बाजारात एक महिना उशिरा माल येऊ लागला आहे. त्यात पूर्वहंगामी व नियमित हंगामातील माल प्रामुख्याने जो काढणीस आला आहे, तो निर्यात केला जात आहे. उरलेला माल बाजारात येत आहे. थंडीचा परिणाम दिसून येत आहे.

मंगळवार (ता. १४) व सोमवार (ता. १३) रोजी द्राक्षांची आवक अडीच क्विंटल झाली. रविवारी (ता. १२) आवक दोन क्विंटल झाली. शनिवारी (ता. ११) आवक दीड, तर शुक्रवारी (ता. १०) १ क्विंटल आवाक झाली. रंगीत द्राक्षांना १५ ते ५० रुपये प्रतिकिलो दर आहे. तर, पांढऱ्या द्राक्षांना १५ ते ३५ रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. आवकेत थोडी थोडी सुधारणा होताना पाहायला मिळत आहे. आवक व मागणी कमी असल्याने माल बाजारात कमी प्रमाणात दिसून येत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com