नगरला भुईमूग शेंगा, कैरीची आवक सुरू

Groundnut, mango incoming in Nagar
Groundnut, mango incoming in Nagar

नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरापासून ओल्या भुईमूग शेंगा, कैरीची आवक सुरू झाली आहे. भुईमूग शेंगांची आठवडाभरात दोन क्विंटलची आवक झाली. त्यांना प्रती क्विंटल कमाल पाच हजारांचा दर मिळाला. कैरीची तीन क्विंटलची आवक होऊन त्यांनाही कमाल पाच हजार रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. भाजीपाल्यात गवारीला सर्वाधिक तीन ते दहा हजार रुपयांचा दर मिळाला. भुसारमध्ये लाल मिरची, तूर, ज्वारीची आवक बऱ्यापैकी होत आहे. 

नगर बाजार समितीत फेब्रुवारी, मार्चच्या काळात भुईमूग शेंगा, कैरीची आवक होत असते. यंदा भुईमूग शेंगांची आवक बऱ्यापैकी वाढणार असल्याचे दिसत आहे. कैरीच्या आवकेवर मात्र बहार पुरेसा आला नसल्याचा परिणाम होणार आहे. भाजीपाल्यात टोमॅटोची सर्वाधिक ७२३ क्विंटलची आवक होऊन दोन ते सहाशे रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला.

वांग्यांची २७६ क्विंटलची आवक झाली. त्यांना दोनशे ते दोन हजार, कोबीची ३९८ क्विंटलची आवक होऊन शंभर ते पाचशे रुपये, काकडीची ३४५ क्विंटलची आवक होऊन २०० ते ११००, गवारीची ४३ क्विंटलची आवक होऊन तीन हजार ते सहा हजार रुपयांचा दर मिळाला. 

घोसाळ्याची १५ क्विंटलची आवक होऊन १५०० ते २५०० रुपये, कारल्याची ५६ क्विंटलची आवक होऊन ८०० ते ३००० रुपये, भेंडीची १३४ क्विंटलची आवक झाली. एक हजार ते तीन हजार रुपये, वालची ६७ क्विंटलची आवक होऊन ४०० ते १००० रुपये, घेवड्याची ६७ क्विंटलची आवक होऊन पाचशे ते बाराशे रुपये, बटाट्याची १२४८ क्विंटलची आवक होऊन चारशे ते दीड हजार, हिरव्या मिरचीची ६५४ क्विंटलची आवक होऊन एक हजार ते २८०० रुपयांचा दर मिळाला.

शेवग्याची आवक कमी झालेली आहे. गेल्या आठवडाभरात १४ क्विंटलची आवक झाली आणि पाच हजार रुपयांचा दर मिळाला. शिमला मिरचीला एक हजार ते अडीच हजार रुपये दर मिळाला.  पालकच्या शंभर जुड्याला २०० ते ३०० रुपयांचा दर मिळाला. 

हरभऱ्याला कमाल ३७०० रुपये

भुसारमध्ये ज्वारीला २२०० ते ३००० रुपये, बाजरीला १४११ ते २२०० रुपये, तुरीला ४००० ते ४७७५, हरभऱ्याला ३५०० ते ३७०० रुपये, लाल मिरचीला ५८२० ते १२९०० रुपयांचा दर मिळाला. गव्हाला ९२५ ते २१०० तर, गूळ डागाला २९०० ते ४४०० रुपयांचा दर मिळाला. चिंचेला अकरा चारशे ते १४९०० रुपयांचा दर मिळत आहे. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत चिंचेची आवक अल्प आहे, असे बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com