Agriculture news in marathi in Kolhapur, Improvement in gawar rates | Agrowon

कोल्हापुरात गवार, घेवड्याच्या दरात सुधारणा

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात टोमॅटोची आवक वाढलेलीच राहिली. त्यांना दहा किलोस २० ते ५० रुपये दर होता. टोमॅटोची दररोज दोन ते तीन हजार कॅरेटची आवक झाली. गवार, घेवड्याच्या दरात सुधारणाच राहिली. गवारीस दहा किलोस ३०० ते ५०० रुपये दर मिळाला. घेवड्यास दहा किलोस ३०० ते ४०० रुपये दर होता. 

कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात टोमॅटोची आवक वाढलेलीच राहिली. त्यांना दहा किलोस २० ते ५० रुपये दर होता. टोमॅटोची दररोज दोन ते तीन हजार कॅरेटची आवक झाली. गवार, घेवड्याच्या दरात सुधारणाच राहिली. गवारीस दहा किलोस ३०० ते ५०० रुपये दर मिळाला. घेवड्यास दहा किलोस ३०० ते ४०० रुपये दर होता. 

गवारीच्या आवकेत या सप्ताहात घट होती. गवारीची दररोज तीस ते चाळीस पोती इतकीच आवक झाली. गेल्या सप्ताहात साठ ते सत्तर पोती गवारीची आवक झाली. घेवड्याची पस्तीस ते चाळीस पाट्या आवक होती. घेवड्यास दहा किलोस ३०० ते ४०० रुपये दर होता. भेंडीची दोनशे ते तीनशे करंड्या आवक होती. भेंडीस दहा किलोस १०० ते २५० रुपये दर मिळाला. काकडीची दोनशे ते तीनशे करंड्या आवक झाली. काकडीस दहा किलोस ५० ते २०० रुपये दर मिळाला. 

पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची २० ते २१ हजार पेंढ्यांची आवक झाली. ही आवक गेल्या सप्ताहाच्या तुलनेत स्थिर राहिली. कोथिंबिरीस शेकडा ३०० ते ९०० रुपये दर मिळाला. मका कणसाची दररोज तीन ते चार हजार नगांची आवक राहिली. शेवगा शेंगेची आवक या सप्ताहात रोडावल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

शेवग्यास दहा किलोस ४०० ते ५५० रुपये

गेल्या सप्ताहात शेवग्याची आवक ५० पोत्यांपर्यंत होती. या सप्ताहात ती निम्म्याने घसरून २५ पोत्यांपर्यंत आली. आठवड्यातील एक दोन दिवस वगळता शेवगा आवक कमी झाल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले.

शेवग्यास दहा किलोस ४०० ते ५५० रुपये दर मिळाला. पालक, पोकळा, शेपूस शेकडा ३०० ते ४०० रुपये दर मिळाला. फळांमध्ये द्राक्षाच्या आवकेत काहीशी वाढ होती. त्यांची दररोज दोनशे ते तीनशे बॉक्‍स आवक होती. द्राक्षास किलोस २० ते ४० रुपये दर मिळाला.

ताज्या बाजार भावासाठी क्लिक करा


इतर ताज्या घडामोडी
विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची ओवाळली आरतीअकोला ः ग्रामीण भागात ‘कोरोना’ची धास्ती वाढलेली...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात केळी...नांदेड : लॅाकडाऊनमुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे....
मुंबई बाजार समितीत फळांची आवक वाढली मुंबई : जीवनावश्यक वस्तूंचा योग्य पुरवठा व्हावा,...
आंब्याची वाहतूक, वितरण व्यवस्थेतील...मुंबई : एप्रिलपासून आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे...
कोल्हापुरात वाहतुक बंदीचा रेशीम कोषाला...कोल्हापूर : वाहतूक बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचे...
मुख्यमंत्री साहायता निधीसाठी ‘कृषी’च्या...नाशिक: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
खानदेशात कडब्याच्या दरांवर दबाव जळगाव : खानदेशातून परराज्यासह इतर जिल्ह्यांत कडबा...
मदत व पुनर्वसन मंत्री देणार ४० हजार...चंद्रपूर ः खऱ्या अर्थाने पालकत्वाची जबाबदारी पार...
खानदेशात धान्याची शिवार खरेदी, मार्केट...जळगाव : खानदेशात धान्याची शिवार खरेदी बंद आहे....
भंडारा बॅंक देणार १५ एप्रिलपासून...भंडारा ः ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव...
नंदुरबार जिल्ह्यात पपईची कवडीमोल दराने...नंदुरबार : लॉकडाऊनचा फटका सर्वसामान्य...
जळगाव जिल्ह्यातील बॅंका पीक कर्ज...जळगाव : जिल्ह्यात अपवाद वगळता बॅंकांनी नव्याने...
हिंगोलीत एका व्यक्तीचा कोरोना चाचणी...हिंगोली : हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात भरती...
शब-ए-बारात, डॉ. आंबेडकर जयंतीला घरुनच...मुंबईः सध्या ‘कोरोना’ने सर्वत्र धुमाकूळ घातला...
खासगी डेअरीची संकलन यंत्रणा तोकडी;...नांदेड ः ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी...
नाशिक बाजार समितीमध्ये केवळ लिलावाला...नाशिक : ‘कोरोना’ विषाणूच्या वाढत्या...
पुणे, मुंबईत भाजीपाल्याची घरपोच सुविधा पुणे ः शहरातील नागरिकांसाठी भाजीपाला पुरवठा...
पुसदमध्ये शेतकरी कंपन्यांतर्फे...यवतमाळ : ‘लॉकडाऊन’च्या पार्श्‍वभूमीवर पुसद येथे...
लातूर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक...चापोली, जि. लातूर : ‘कोरोना’चा फैलाव...
कोरोना’च्या संकटामुळे माळेगावचे गाळप...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव सहकारी साखर...