परभणीत काकडी ५०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल

in Parbhani cucumber 500 to 800 rupees per quintal
in Parbhani cucumber 500 to 800 rupees per quintal

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. २८) काकडीची ७० क्विंटल आवक होती. काकडीला प्रतिक्विंटलला किमान ५०० ते कमाल ८०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडक्याची १५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. कारल्याची २० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटलला १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची ४० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ३०० ते ५०० रुपये दर मिळाले. गोल भोपळ्याची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ५०० ते ८०० रुपये दर मिळाले. 

पालेभाज्यांमध्ये मेथीच्या ३० हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकड्याला किमान १०० ते कमाल २५० रुपये दर मिळाले. पालकाची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ३०० ते ६०० रुपये दर मिळाले. शेपूची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ५०० ते १००० रुपये दर मिळाले. चुक्याची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १००० ते १५०० रुपये दर मिळाले.

कोथिंबिरीची १०० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटलला ५०० ते १००० रुपये दर मिळाले. शेंगवर्गीय भाज्यामध्ये शेवग्याची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ३००० ते ४००० रुपये दर मिळाले.

वाटाण्याची ४० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २२०० ते ३००० रुपये दर मिळाले. गवारीची १२ क्विंटल आवक झाली. तिला ३००० ते ४००० रुपये दर मिळाले. वालाची १५ क्विंटल आवक, तर दर ८०० ते १२०० रुपये मिळाले.  चवळीची ७ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटलला किमान २००० ते कमाल २५०० रुपये दर मिळाले.

वांग्यांची ६० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटलला ६०० ते १२०० रुपये दर मिळाले. टोमॅटोची ३००० क्रेट आवक होऊन प्रतिक्रेटला ३० ते ६० रुपये रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची ६० क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटलला १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची १२ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटलला १२०० ते २००० रुपये दर मिळाले.

गाजरांना किमान ५०० ते कमाल ८०० रुपये दर

कंदवर्गीय भाज्यांमध्ये बीटरुटची १२ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विटंलला किमान १२०० ते कमाल २००० रुपये दर मिळाले. मुळ्यांची १० हजार नग आवक होऊन शेकडा १०० ते २५० रुपये दर मिळाले. गाजराची २५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ५०० ते ८०० रुपये दर मिळाले. पातीच्या कांद्याची १० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटलला ६०० ते १००० रुपये दर मिळाले. लिंबांची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १२०० ते २००० रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com