Agriculture news in Marathi Reduced arrival of green chillies in Pune; Increase in rates | Agrowon

पुण्यात हिरव्या मिरचीची आवक कमी; दरात वाढ

टीम अॅग्रोवन
सोमवार, 2 मार्च 2020

पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १) भाजीपाल्याची सुमारे १४० ते १५० ट्रक आवक झाली होती. भाजीपाल्याची आवक आणि मागणी स्थिर असल्याने दर देखील स्थिर होते. तर आवक कमी असल्याने हिरव्या मिरचीच्या दरात १० ते १५ टक्के दरवाढ झाली. शिमला मिरची, प्लॉवर, कोबी, शेवगा, मटार आणि पावट्याला आवकेच्या तुलेनत मागणी कमी असल्याचे सांगण्यात आले.

पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १) भाजीपाल्याची सुमारे १४० ते १५० ट्रक आवक झाली होती. भाजीपाल्याची आवक आणि मागणी स्थिर असल्याने दर देखील स्थिर होते. तर आवक कमी असल्याने हिरव्या मिरचीच्या दरात १० ते १५ टक्के दरवाढ झाली. शिमला मिरची, प्लॉवर, कोबी, शेवगा, मटार आणि पावट्याला आवकेच्या तुलेनत मागणी कमी असल्याचे सांगण्यात आले.

परराज्यातून झालेल्या आवकेमध्ये आंध्रप्रदेश, गुजरात आणि कर्नाटक येथून हिरवी मिरची सुमारे १५ टेम्पो, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा सुमारे ४ टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा ५ टेम्पो, राजस्थानातून गाजर, मटार प्रत्येकी ७ ते ८ ट्रक, कर्नाटक आणि गुजरात येथून कोबी सुमारे ३ ते ४ ट्रक, मध्यप्रदेशातून लसणाची सुमारे साडेपाच हजार गोणी, गुजरात, कर्नाटकातून १५० पोती भुईमूग शेंग, इंदौर आणि स्थानिक बटाट्याची सुमारे ४५ ट्रक आवक झाली होती.

तर स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे ९०० पोती, टॉमेटो सुमारे ६ हजार क्रेट, भेंडी १०ते १२ टेम्पो, गवार ७ ते ८ टेम्पो, काकडी, सिमली मिरची आणि तांबडा भोपळा प्रत्येकी सुमारे १० ते १२ टेम्पो, फ्लॉवर १४ टेम्पो, कोबी १० टेम्पो, पावटा ६ टेम्पो, हिरवी मिरची ५ टेम्पो, कांदा सुमारे १७५ ट्रक आवक झाली होती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा : १५०-१८०, बटाटा : १३०-१८०, लसूण : ३००-७००, आले : सातारी ३००-४००, भेंडी : २००-३००, गवार : ३००-५००, टोमॅटो : ४०-५०, दोडका : १००-२००, हिरवी मिरची : २५०-३२०, दुधी भोपळा : ६०-१२०, चवळी : २००-२५०, काकडी : ८०-१२०, कारली : हिरवी १५०-२००, पांढरी १००-१२०, पापडी : १००-१२०, पडवळ : १४०-१५०, फ्लॉवर : ४०-५०, कोबी : ३०-५०, वांगी : १००-२००, डिंगरी : १५०-२००, नवलकोल : ७०-८०, ढोबळी मिरची : २००-२५०, तोंडली : कळी १५०-२००, जाड : ८०-१००, शेवगा : २००-२५०, गाजर : १४०-१६०, वालवर : १००-१४०, बीट : ५०-६०, घेवडा : १५०-१६०, कोहळा : १००-१५०, आर्वी : ३००-३५०, घोसावळे : १५०-१६०, ढेमसे : २००-२२०, पावटा : १८०-२००, भुईमूग शेंग : ५००-६५०, मटार : स्थानिक २८०-३००, परराज्य  २२०-२६०, तांबडा भोपळा : १००-१५०, सुरण : २००-२२०, मका कणीस : ६०-१२०, नारळ (शेकडा) : १०००-
२०००.

पालेभाज्या
पालेभाज्यांमध्ये रविवारी (ता. १) कोथिंबिरीची सुमारे दीड लाख, मेथीची सुमारे ७५ हजार जुड्यांची आवक झाली होती. पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : ७००-१४००, मेथी : ३००-५००, शेपू : ५००-६००, कांदापात : ५००-७००, चाकवत : ५००-६००, करडई : ४००-५००, पुदिना : १००-२००, अंबाडी : ५००-६००, मुळे : ४००-६००, राजगिरा : ४००-५००, चुका : ८००-१०००, चवळई : ५००-७००, पालक : ४००-५००, हरभरा गड्डी : ५००-७००.

फळबाजार
रविवारी (ता. १) येथील बाजारात मोसंबी ४५ टन, संत्री सुमारे ७० टन, डाळिंब ८० टन, पपई १५ टेम्पो, लिंबे सुमारे साडे तीन हजार गोणी, कलिंगड ३० टेम्पो, खरबूज १० टेम्पो, द्राक्षे सुमारे ३५ टन, पेरू २५० क्रेट, चिक्कू २ हजार डाग, स्ट्रॉबेरी सुमारे ५ टन आवक झाली होती. फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : ५०-२५०, अननस (डझन) : ७०-२७०, मोसंबी : (३ डझन) : ९०-२००, (४ डझन) : ४०-१३०, संत्रा : (३ डझन) : ९०-२५०, (४ डझन) : ४०-१३०, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ३०-१५०, गणेश : २०-५०, आरक्ता २०-६०. कलिंगड : ५-१२, खरबूज : १०-३०, पपई : ५-२०, चिक्कू : १००-७००, स्ट्रॉबेरी (दोन किलोस): ६०- १४० पेरू (२० किलो) : ४००-६००, सफरचंद : कश्मिर डेलिशियस (१५-१६ किलो) : ९००: १४००, शिमला (२५ किलो):  १५००-२०००, किन्नोर (२५ किलो): २०००- २५००, किन्नू (१० किलो) ३००-३५०, द्राक्षे (१५ किलो) सोनाका : ६०० ते १०००, तास ए गणेश :  ४५०-६००, जम्बो : ७००-१२००.

फुलबाजार
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-३०, गुलछडी : ६०-१२०, कापरी : १०-३०, शेवंती : ६०- १००, अ‍ॅस्टर : ८-१६, गुलाबगड्डी : १०-२०, गुलछडी काडी : २०-५०, डच गुलाब (२० नग) : ५०-१००, लिली बंडल : ४-६, जर्बेरा : १०-३०, कार्नेशियन ६०-१२०, मोगरा :४००- ६००.

मासळी बाजार
उन्हाचा कडाका वाढल्याने मासळी बाजारात कमी प्रमाणात मासळी दाखल  होत आहे. त्या तुलनेत मागणी चांगली असल्याने भावात दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत चिकन, अंडी व मटणाला मागणी कायम असून भाव स्थिर राहिले आहेत. गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता. १) खोल समुद्रातील मासळीची सुमारे ६ ते ८ टन, खाडीची सुमारे २०० ते ३०० किलो तर नदीच्या मासळीची एक ते दीड टन आवक झाली. तर, आंध्रप्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे ८ ते १० टन आवक झाली. असल्याची माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.  

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) : पापलेट : कापरी : १५००, मोठे १५००, मध्यम : १०००-११००, लहान ८००-९००, भिला :  ६००, हलवा : ६००-७००, सुरमई : ६००-६५०, रावस : लहान ६००-६५०,  मोठा : ८००-९००, घोळ : ७००, भिंग : ४००, करली : ३२०, करंदी : ४००, पाला : लहान ७०० मोठे : १२००, वाम :  पिवळी लहान ७००, मोठी ९००, काळी : ४००, ओले बोंबील : १६०-२००, कोळंबी : लहान २८०, मोठे : ४८०, जंबोप्रॉन्स : १४००-१५००, किंगप्रॉन्स : ७००, लॉबस्टर : १४००-१५००, मोरी : ३२०, मांदेली : १२०-१६०, राणीमासा : २०० खेकडे : २४०, चिंबोऱ्या : ५५०-६००. खाडीची मासळी : सौंदाळे : २८०-३२०, खापी : ३२०, नगली : ४४०, तांबोशी : ४८०, पालू : २८०, लेपा : २४०, शेवटे : २८०, बांगडा : लहान २०० , मोठा २८०, पेडवी : १००, बेळुंजी : १४०-१६०, तिसऱ्या : १६०, खुबे : १६०, तारली : १८०-२००. नदीची मासळी : रहू : १४०-१६०, कतला : १४०-१६०, मरळ : ४००, शिवडा : २४०, खवली : २४०, आम्ळी : १६०, खेकडे : २०० वाम : ५५०-६००. 

चिकन बाजार
चिकन : १४०, लेगपीस : १७०, जिवंत कोंबडी : ११०, बोनलेस : २४०. अंडी : गावरान : शेकडा : ७३० डझन : ९६ प्रति नग : ८, इंग्लिश : शेकडा : ३७४ डझन : ५४ प्रतिनग : ४.५०. मटण : बोकडाचे : ५८०, बोल्हाईचे : ५८० खिमा : ५८०, कलेजी : ६४०.

ताज्या बाजार भावासाठी येथे क्लिक करा


इतर ताज्या घडामोडी
स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभाव दिल्याचा...नाशिक: स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च...
उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (...
नगरच्या ४० महसूल मंडळांत जोरदार पाऊसनगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३)...
परभणी, नांदेड, हिंगोलीत पावसामुळे कापूस...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात गेल्या...
बुलडाण्यात पीककर्जाचे ७ टक्केच वाटप बुलडाणा : पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर संततधार...कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरूच...
निसर्ग चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला...पुणे : निसर्ग चक्रीवादळाचा जिल्ह्यालाही फटका...
नाशिकच्या पूर्व भागात वादळामुळे नुकसान नाशिक : जिल्ह्यात बुधवार (ता.३) सकाळपासून सर्वदूर...
सांगली जिल्ह्यात बरसला मुसळधार सांगली : कोकणचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या...
विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाची...नागपूर : विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाने...
साताऱ्यात वाऱ्यासह मुसळधार पाऊस सातारा : जिल्ह्यात बुधवारी सकाळापासून...
‘निसर्ग’मुळे रत्नागिरी जिल्ह्यात...रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात...
भाटी मिऱ्या समुद्रात नांगरलेली जहाज...चिपळूण, रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार...
जीएम पिकांच्या मान्यतेसाठी केंद्राकडे...नागपूर: जागतिकस्तरावर जीएम पिकांच्या लागवडीस...
विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार ...नाशिक: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार व...
मका खरेदी तातडीने सुरू कराबुलडाणा ः मोताळा तालुक्‍यात मागील दहा दिवसांपासून...
शेतकऱ्यांना त्रास झाल्यास भाजप आंदोलन...अकोला ः शेतकऱ्यांना बी-बियाणे, कर्जपुरवठा तसेच...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच सिंधुदुर्ग: जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही...
जादा खरेदी दर, नापासच्या अधिक ...अकोला ः महाबीजने सोयाबीन वाणाच्या प्रमाणित...
ऊस उत्पादक केंद्राचे वैरी आहेत काय? कोल्हापूर: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या...