नगरला गवार, शेवग्याच्या दरात तेजी कायम 

Shaggy prices remain bullish
Shaggy prices remain bullish

नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक बऱ्यापैकी होत आहे. भाजीपाल्यात गवार, शेवग्याच्या दरात तेजी कायम आहे. कोबी, टोमॅटोच्या दरात मात्र, काहीशी घसरण झाली आहे. भुसारमध्ये ज्वारी, तुरीच्या आवकेत वाढ झाली आहे. मात्र, एफआरपी दरापेक्षा कमी दरानेच खरेदी सरू आहे.

नगर बाजार समितीत गेल्या आठ दिवसांत भाजीपाल्याच्या आवकेत बऱ्यापैकी वाढ होत आहे. टोमॅटोची ४५५ क्विंटलची आवक होऊन प्रतिक्विंटलला १०० ते ६०० रुपये दर मिळाला. वांग्याची ९८ क्विंटलची आवक होऊन २०० ते १२०० रुपये, फ्लॉवरची ३०७ क्विंटलची आवक होऊन २०० ते १०००, कोबीची २८७ क्विंटलची आवक होऊन १०० ते ५०० रुपये, काकडीची १६७ क्विंटलची आवक होऊन ५०० ते १३०० रुपये, गवारची १६ क्विंटलची आवक होऊन ५००० ते ८५०० रुपये, घोसाळ्याची २३ क्विंटलची आवक होऊन १००० ते २०००, कारल्याची ४५ क्विंटवलची आवक होऊन १००० ते २५००, भेंडी ५६ क्विंटलची आवक होऊन १००० ते २५००, वालाची २२ क्विंटलची आवक होऊन ५०० ते १२००, घेवड्याची १७ क्विंटलची आवक होऊन ६०० ते १२०० रुपये दर मिळाला. लसुणाची आवक कमीच  आहे.

आठवडाभरात लसुणाची २१ क्विंटलची आवक होऊन ६००० ते दहा हजार रुपये दर मिळाला. हिरव्या मिरचीची ४१२ क्विंटलची आवक होऊन १२०० ते २६०० रुपये दर मिळाला. बटाच्याची ४५३६ क्विंटलची आवक झाली. बटाट्याला ८०० ते १६०० रुपये दर मिळाला. शिमला मिरचीची ७९ क्विंटलची आवक होऊन ७०० ते २७०० रुपये दर मिळाला. 

कोथिंबिरीच्या ६७८४ जुड्यांची आवक झाली. शंभर जुड्याला २०० ते ७०० रुपये दर मिळाला. मेथीच्या ३४७६ जुड्याची आवक होऊन ४०० ते ६००, पालकच्या १७६५ जुड्याची आवक होऊन ३०० रुपये दर मिळाला,  असे बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांनी सांगितले.   

ज्वारी, तुरीची आवक भुसारमध्ये ज्वारी, तुरीच्या आवकेत वाढ झाली आहे. ज्वारीची ४९८ क्विंटलची आवक होऊन २३०० ते ३२७५ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. बाजरीची २६५ क्विंटलची आवक होऊन १४०० ते २००० रुपये, तुरीची २४५ क्विंटलची आवक होऊन ३८०० ते ४८०० रुपये दर मिळाला. हरभऱ्याची ५५७ क्विंटलची आवक होऊन ३३५० ते ४००० रुपये दर मिळाला. मुगाची २३ क्विंटलची आवक होऊन ६००० ते ७००० रुपये दर मिळाला. उडिदाची १५ क्विंटलची आवक होऊन ४५०० हजार रुपये दर मिळाला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com