नाशिकमध्ये मिरची १००० ते ३००० रुपये

There is no demand for chilli in Nashik
There is no demand for chilli in Nashik

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू सप्ताहात हिरवी मिरचीची आवक ८५३ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल १००० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. आवकेत घट झाली असून परपेठेत मागणी कमी असल्याने बाजारभाव कमी होते. लवंगी मिरचीला १५०० ते ३०००; तर ज्वाला मिरचीला १००० ते १५०० प्रतिक्विंटल दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांकडून देण्यात आली.

चालू सप्ताहामध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर घटल्याचे दिसून आले. आवक ६६९८ क्विंटल झाली. बाजारभाव १३००ते २२५० प्रतिक्विंटल होते. आवक कमी झाल्याने बाजारभाव स्थिर दिसून आले. बटाट्याची ७४७३ क्विंटल आवक झाली. बाजारभाव ७०० ते १९००  प्रतिक्विंटल होते. लसणाची आवक ६४१ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ४००० ते ११००० बाजारभाव मिळाला. आद्रकची आवक १४८ क्विंटल झाली. त्यास ३५००ते ४५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. 

सप्ताहात काही फळभाज्यांची आवक कमी; तर काहींची आवक जास्त झाल्याने बाजारभावसुद्धा कमी जास्त निघाले. वालपापडी घेवड्याची आवक ११००० क्विंटल झाली. वालपापडीला प्रतिक्विंटल ५०० ते १२०० दर मिळाला; तर घेवड्याला १५०० ते २५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. वाटाण्याची आवक ११०५ क्विंटल झाली. त्यास १५०० ते २५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. 

फळभाज्यांमध्ये टोमॅटोला ५० ते १००, वांगी ६० ते २००, फ्लॉवर ५० ते १०० असे प्रति १४ किलोस दर मिळाले. तर कोबी २५ ते ५० असा प्रति २० किलोस दर मिळाला. ढोबळी मिरची १५० ते २५० असा प्रति ९ किलोस दर मिळाला. भोपळा ७० ते २५०, कारले २०० ते ३५०, दोडका २५० ते ३५०, गिलके १२५ ते १७०,  भेंडी २०० ते ४०० असे प्रति १२ किलोस दर मिळाले; तर काकडीला १०० ते ३००, लिंबू १५० ते ३५० असे प्रति २० किलोस दर मिळाले. 

फळांमध्ये चालू सप्ताहात डाळिंबाची आवक ५९२ क्विंटल झाली. आरक्ता वाणास प्रतिक्विंटल ६०० ते ६७५० व मृदुला वाणास ६५० ते ८२०० प्रतिक्विंटल दर मिळाला. खरबुजाची आवक ५७० क्विंटल झाली. त्यास १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. टरबुजाची आवक २१५० क्विंटल झाली. त्यास ७०० ते १४०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com