Tur Rate : तूर दरातील तेजी कायम राहणार

देशात यंदा तुरीचे उत्पादन कमी राहण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यातच मागणील हंगामातील तूरही कमी उपलब्ध आहे. परिणामी बाजारात तुरीची टंचाई भासत आहे.
Tur Rate
Tur Rate Agrowon

देशात यंदा तुरीचे उत्पादन (Tur Production) कमी राहण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यातच मागणील हंगामातील तूरही कमी उपलब्ध आहे. परिणामी बाजारात तुरीची टंचाई भासत आहे. त्यामुळे तुरीचे दर (Tur Rate) तेजीत आहेत. सध्या देशातील बाजारात तुरीला सरासरी ७ हजार ते ८ हजार रुपये दर मिळत आहे.

देशात यंदा तुरीची लागवड जवळपास साडेचार टक्क्यांनी कमी झाली. तर अगदी लागवडीच्या काळापासून तूर पिकाला पावसाचा फटका बसतोय. जून महिन्यात महत्वाच्या तूर उत्पादक राज्यांमध्ये पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. त्यामुळे तुरीच्या पेरण्या जुलै महिन्यापासून सुर झाल्या. तर ऑगस्ट महिन्यात सलग ८ ते १० दिवस पाऊस झाला.

Tur Rate
Soybean Crop Management : सोयाबीन कापणी, मळणी व साठवणुकीदरम्यान घ्यावयाची काळजी

त्यामुळे वाढीच्या अवस्थेत असलेल्या तूर पिकाला मोठा फटका बसला. आता ऑक्टोबर महिन्यात सलग २० दिवसांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे फुलोऱ्यातील पिकाचे नुकसान झाले.

Tur Rate
Weed Crop : तणनियंत्रणासाठी सोपे अवजार, गवत तलवार

बाजारातील अभ्यासक आणि प्रक्रिया उद्योगाच्या मते देशात यंदा २५ ते २७ लाख टनांच्या दरम्यान तूर उत्पादन होईल. मात्र केंद्राने जवळपास ३९ लाख टन तूर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केलाय. पण सरकार सुधारित अंदाजात उत्पादनाचा आकडा कमी करू शकते, असंही जाणकारांनी सांगितले.

त्यातच सध्या देशातील तूर पुरवठा यंदा कमी राहण्याचा अंदाज व्यक्त होतोय. त्यामुळे दरही तेजीत राहण्याची शक्यता आहे. देशातील नवी तुरीची आवक डिसेंबर महिन्यापासून वाढेल. तर पुढील किमान तीन महीने बाजारात तूर येत राहील.

देशात महिन्याला जवळपास साडेचार लाख टन तुरीचा वापर होतो. म्हणजेच देशाला सरासरी ४४ ते ४५ लाख टन तुरीची गरज असते. पण यंदा उत्पादनात मोठी घट अपेक्षित अल्याने त्यामुळे चालू वर्षात तुरीची टंचाई वाढण्याची शक्यता आहे. ही टंचाई लक्षात घेऊन केंद्र सरकार आयात तुरीची खरेदी करत आहे.

मात्र आफ्रिकेतून तूर आयातीत काही समस्या येत आहेत. तर म्यानमारमध्ये पावसाचा पिकाला फटका बसतोय. त्यातच टंचाई असल्याने प्रक्रिया उद्योगही आयात तूर खरेदी करतोय. त्यामुळे सरकारने जाहीर केलेल्या आधारभूत दरात किती खरेदी होईल, याबाबत शाशंकता आहे. पण सरकारच्या आधारभूत दरापेक्षा बाजारातील दर अधिक राहतील, असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळे सध्या तरी तुरीला ७ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान दर राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com