Wheat Rate : गव्हाचे दर पुन्हा वाढले

देशात दिवाळीमुळे ऑक्टोबर महिन्यात गव्हाचे दर वाढले होते. यंदा हंगाम सुरु झाल्यापासून गव्हाचे दर तेजीत होते.
Wheat Rate
Wheat RateAgrowon

पुणेः देशात दिवाळीमुळे (Diwali Month) ऑक्टोबर महिन्यात गव्हाचे दर वाढले होते. यंदा हंगाम सुरु झाल्यापासून गव्हाचे दर (Wheat Rate) तेजीत होते. दरात आणखी वाढ होईल, या आशेने शेतकऱ्यांनी गहू मागे ठेवला होता. आता दर पुन्हा सुधारल्याने शेतकऱ्यांनी गहू विक्रीला (Wheat Production) पसंती दिली.

देशात यंदा गहू उत्पादन घटले. तसेच निर्यातही जास्त झाली. त्यामुळे गव्हाचे दर तेजीत होते. खुल्या बाजारात गव्हाचे दर तेजीत असल्याने सरकारला गहू खरेदीचे उद्दीष्ट साध्य करता आले नाही. अनेक शेतकऱ्यांनी दर वाढेल, या आशेने गव्हाचा साठा मागे ठेवला होता. शेतकऱ्यांनी गहू मागे ठेवल्याने एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीतील गहू आवक यंदा मागील तीन वर्षांतील उच्चांकी ठरली. आता ऑक्टोबर महिन्यात दिवाळीच्या सणामुळे गव्हाला मागणी वाढली होती.

Wheat Rate
Man Made Disaster : मानवनिर्मित प्रलय

यंदा रब्बीतील गहू आवक सुरु झाल्यापासून म्हणजेच एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत बाजारात २१५ लाख टन गहू आवक झाली. मागील हंगामात, म्हणजेच २०२२ च्या हंगामात १८० लाख टनांची आवक या काळात झाली होती. म्हणजेच यंदा मागीलवर्षीच्या तुलनेत ३५ लाख टनांनी आवक जास्त राहिली. तर २०१९ च्या हंगामातील आवक १५६ लाख टनांच्या दरम्यान होती. म्हणजेच यंदाची आवक ५९ लाख टनांनी जास्त आहे.

यंदा शेवटच्या टप्प्यात गव्हाची आवक वाढली. याचाच अर्थ असा की शेतकऱ्यांनी यंदा गव्हाचा साठा मागे ठेवला होता. त्यामुळे यंदा सरकारला केवळा १८८ लाख टन गहू हमीभावाने खरेदी करता आला. तर मागील हंगामातील खरेदी ४३४ लाख टनांवर झाली होती.

दुसरीकडे यंदा बाजारातील आवक कमी राहिल्याने दरही तेजीत होते. सप्टेंबर महिन्यात गव्हाला सरासरी २ हजार ५५० रुपये दर मिळाला. तर सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील दर सरासरी २ हजार ४०० रुपांवर पोचला होता. मात्र ऑक्टोबर महिन्यात गव्हाच्या दराने २ हजार ६५० रुपयांचा टप्पा गाठला. दिवाळीमुळे गव्हाला उठाव मिळाल्याने दर वाढल्याचे बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले.

देशात महिन्याला जवळपास साडेचार लाख टन तुरीचा वापर होतो. म्हणजेच देशाला सरासरी ४४ ते ४५ लाख टन तुरीची गरज असते. पण यंदा उत्पादनात मोठी घट अपेक्षित अल्याने त्यामुळे चालू वर्षात तुरीची टंचाई वाढण्याची शक्यता आहे. ही टंचाई लक्षात घेऊन केंद्र सरकार आयात तुरीची खरेदी करत आहे.

मात्र आफ्रिकेतून तूर आयातीत काही समस्या येत आहेत. तर म्यानमारमध्ये पावसाचा पिकाला फटका बसतोय. त्यातच टंचाई असल्याने प्रक्रिया उद्योगही आयात तूर खरेदी करतोय. त्यामुळे सरकारने जाहीर केलेल्या आधारभूत दरात किती खरेदी होईल, याबाबत शाशंकता आहे. पण सरकारच्या आधारभूत दरापेक्षा बाजारातील दर अधिक राहतील, असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळे सध्या तरी तुरीला ७ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान दर राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com