Sugarcane Crushing : दत्त कारखान्याकडून साडेअकरा लाख टन उसाचे गाळप

१२७ दिवस चाललेल्या या हंगामात ११,४८,६७५ टन उसाचे गाळप होऊन १२.१७ टक्के सरासरी साखर उताऱ्याने १२,३३,६८० पोत्यांचे साखर उत्पादन झाले आहे.
Sugarcane Crushing
Sugarcane CrushingAgrowon

Kolhapur News : शिरोळा येथील श्री दत्त सहकारी साखर कारखान्याने (Shree Dutt Cooperative Sugar Factory) गळीत हंगामात उसाचे ११ लाख ४८ हजार टन गाळप (Sugarcane Crushing) केल्याची माहिती अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी दिली. कारखान्याचा गळीत हंगाम नुकताच समाप्त झाला, त्या वेळी ते बोलत होते.

पाटील म्हणाले, की १२७ दिवस चाललेल्या या हंगामात ११,४८,६७५ टन उसाचे गाळप होऊन १२.१७ टक्के सरासरी साखर उताऱ्याने १२,३३,६८० पोत्यांचे साखर उत्पादन झाले आहे.

कारखान्याने राबविलेल्या विविध ऊस विकास योजना व सभासदांना वेळोवेळी ऊस उत्पादन वाढीसंदर्भात केलेले मार्गदर्शन यामुळे या हंगामात हेक्टरी सरासरी ९९.६० टन उत्पादन मिळाले आहे.

Sugarcane Crushing
Sugarcane Crushing : नांदेड विभागात एक कोटी टन उसाचे गाळप

यामध्ये आडसाली ऊस १२८.९० टन, पूर्वहंगामी १०९ टन, सुरू ७५.६९ टन व खोडवा ७३.२० टन असे हेक्टरी उत्पादन प्राप्त झाले आहे.

एकूण साखर उत्पादन व मार्केटमध्ये साखरेला अपेक्षेप्रमाणे मागणी नसल्यामुळे सर्वच कारखान्यांना आर्थिक तोंडमिळवणी करणे अत्यंत अडचणीचे व जिकीरीचे झाले आहे.

अशा परिस्थितीतही कारखान्याने हंगाम २०२२-२३ सुरुवातीपासून उपलब्ध झालेल्या उसाचे ‘एफआरपी’प्रमाणे प्रतिटन रुपये २९५० प्रमाणे पेमेंट विनाकपात मुदतीत ज्या त्या वेळी सभासदांना अदा केले आहे.

चालू हंगामात कारखान्यास पुरवठा झालेल्या सर्व उसाचे प्रतिटन रुपये २९५० प्रमाणे पेमेंट सभासदांच्या खात्यावर वर्ग केले असल्याचे पाटील यांनी संगितले.

स्वागत कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनी केले. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक राजाभाऊ शिरगुप्पी, अशोकराव निर्मळे, महाराष्ट्र राज्य कामगार संघटनेचे सदस्य राऊ पाटील, प्रॉडक्शन मॅनेजर व्ही. व्ही. शिंदे, वर्क्स मॅनेजर संजय संकपाळब तसेच ज्येष्ठ व्याख्याते वसंत हंकारे यांचे आनंदी जीवनावर व्याख्यान झाले. आभार कामगार युनियनचे अध्यक्ष बाळासाहेब बनगे यांनी मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com