Monsoon Update : पावसाळ्यात २५ वेळा उधाण

Rain Update : काही दिवसातच पावसाचे आगमन होणार असून त्‍याबरोबरच वादळी वारे आणि अरबी समुद्रात उसळणाऱ्या उंचच उंच लाटा कोकण किनारपट्टीवर धडकणार आहेत.
Monsoon Update
Monsoon UpdateAgrowon

Alibaug News : काही दिवसातच पावसाचे आगमन होणार असून त्‍याबरोबरच वादळी वारे आणि अरबी समुद्रात उसळणाऱ्या उंचच उंच लाटा कोकण किनारपट्टीवर धडकणार आहेत.

यातून बचावासाठी हवामान विभागाने उधाणाचे वेळापत्रक जाहीर आहे. यंदा २५ दिवस साडेचार मीटर उंचीच्या लाटा रायगड समुद्र किनाऱ्यावर धडकणार असल्‍याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

समुद्राला येणाऱ्या उधाणामुळे अलिबाग तालुक्यातील धेरंड, बहिरीचा पाडा, माणकुळे, कावाडे, मिळकत खार परिसरातील नागरिकांना दरवर्षी सुरक्षितस्थळी जावे लागते. याच दरम्यान किनारपट्टीलगतची वाहतूक विस्कळित होते.

दळणवळणाची साधने बंद झाल्‍याने नागरिकांना जीवनावश्‍यक वस्‍तू पोहोचवण्यातही अडचणी येतात. उधाणाचा पाणी चार-पाच दिवस साचून राहत असल्याने नोकरदार वर्ग, मजुरांबरोबरच मुलांना शाळेत जाणे शक्य होत नाही.

अशा नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी किनारपट्टीलगतच्या नागरिकांनी उधाणाच्या तारखा पाहून आतापासूनच नियोजन सुरू केले आहे.

Monsoon Update
Ratnagiri Rain Update : रत्नागिरी, चिपळूणला सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी

उधाणाचे वेळापत्रक

४ जून १२.१६ वा. ४.६२ मीटर

५ जून १३.०१ वा. ४.६९ मीटर

६ जून १३.४७ वा. ४.६९ मीटर

७ जून १४.३५ वा. ४.६४ मीटर

८ जून १५.२५ वा. ४.५१ मीटर

३ जुलै १२.२ वा. ४.७२ मीटर

४ जुलै १२.४९ वा. ४.७२ मीटर

५ जुलै १२.३६ वा. ४.७८ मीटर

६ जुलै १२.२३ वा. ४.७७ मीटर

७ जुलै १२.१० वा. ४.६९ मीटर

८ जुलै १२.५५ वा. ४.५२ मीटर

१ ऑगस्ट ११.४६ वा. ४.५८ मीटर

२ ऑगस्ट १२.३० वा. ४.७६ मीटर

३ ऑगस्ट १३.१४ वा. ४.८७ मीटर

४ ऑगस्ट १३.५६ वा. ४.८७ मीटर

५ ऑगस्ट ४.३८ वा. ४.८७ मीटर

६ ऑगस्ट १५.२० वा. ४.५१ मीटर

३० ऑगस्ट ११.२६ वा. ४.५९ मीटर

३१ ऑगस्ट १२.०६ वा. ४.८० मीटर

१ सप्टेंबर १२.४४ वा. ४.८८ मीटर

२ सप्टेंबर १३.२२ वा. ४.८४ मीटर

३ सप्टेंबर १.५२ वा. ४.६४ मीटर

२८ सप्टेंबर ११.०० वा. ४.५६ मीटर

२९ सप्टेंबर ११.३७ वा. ४.७९ मीटर

३० सप्टेंबर ८.०० वा. ४.७४ मीटर

Monsoon Update
Monsoon Measures : विभागीय आयुक्तांनी घेतला मराठवाड्यातील मान्सून उपाययोजना आणि पूर परिस्थितीचा आढावा
मान्सूनपूर्व तयारीत उधाणाचा समावेश आहे. किनारपट्टीलगतच्या लोकांना उधाणाचा तडाखा बसत असतो, त्यामुळे किनारी भागातच उपाययोजना कराव्या लागतात. ४.५० मीटर उंचीच्या लाटांमुळे नुकसानीचे प्रमाण जास्त असतो, हे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
सागर पाठक, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
उधाणामुळे पिकती भातशेती नापिक होते. खारलॅण्ड विभाग, महसूल विभागानेकडून उधाणाच्या नुकसानीकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही, त्‍यामुळे ७० टक्के किनारपट्टीवरील पिकती भातशेती नापिक झाली आहे. उधाणाचा तडाखा सौम्य करण्यासाठी खारबांध बंदिस्तीची दुरुस्ती होणे आवश्यक आहे.
राजन भगत, जिल्हा समन्वयक, श्रमिक मुक्त दल

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com