Electricity Bill : सिंधुदुर्ग-रत्नागिरीत ५३ कोटींची वीजबिल थकित

कोरोना कालावधीतील कोट्यवधी रुपयांची वीजबिले ग्राहकांनी भरणा केलेली नाहीत. त्यामुळे थकबाकीचा आकडा कित्येक कोटी रुपयांवर पोहोचला होता.
Electricity Bill
Electricity BillAgrowon

Sindhudurg News : सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमध्ये ५३ कोटी रुपयांची वीजबिल थकबाकी (Electricity Arrears) असून, थकित वीजबिल (Electricity Bill Recovery) तातडीने वसुली करण्याच्या सूचना सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी दिल्याची माहिती महावितरणचे कोकण विभाग जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे यांनी दिली.

कोरोना कालावधीतील कोट्यवधी रुपयांची वीजबिले ग्राहकांनी भरणा केलेली नाहीत. त्यामुळे थकबाकीचा आकडा कित्येक कोटी रुपयांवर पोहोचला होता.

त्यानंतर वीज कनेक्शन बंद करण्यात येऊ लागली. त्यात काही ग्राहकांनी थकित वीजबिले भरली देखील आहेत. असे असले तरी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांत अजूनही ५३ कोटी रुपयांची वीजबिले थकलेली आहेत.

Electricity Bill
Agriculture Electricity : वीजबिल वसुलीसाठी तोडल्या ७९०० जोडण्या

रत्नागिरी जिल्ह्यातील १ लाख ६ हजार ८३६ ग्राहकांकडे २४ कोटी ५० लाख, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८० हजार २२३ ग्राहकांकडे २९ कोटी ५ लाख रुपये वीजबिल थकीत आहे. या संदर्भात श्री. डांगे यांनी या दोन जिल्ह्यांतील थकित वीजबिलाचा आढावा घेतला.

या बैठकीला विजय भटकर, नितीन पळसुले-देसाई, विनोद पाटील आदी उपस्थित होते. याशिवाय औद्योगिक, कृषिपंप (Agriculture Pump), पथदिवे, पाणीपुरवठा, सार्वजनिक सेवा आदीची बिलेदेखील थकित आहेत.

ही बिले तातडीने वसुली करण्याच्या सूचना श्री. डांगे यांनी दोनही जिल्ह्यांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे यांनी दिली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com