Animal Care : पशुवैद्यकीय सुविधांसाठी दबाव गट सक्रिय करावा लागेल

दुभत्या जनावरांची संख्येपेक्षा दूध उत्पादन वाढण्यासाठी प्रयत्न हवेत. प्रक्रिया पदार्थाच्या निर्मितीतून दुधाचे मूल्यवर्धन शक्य आहे.
Animal Care
Animal CareAgrowon

Parbhani News : पशुधनांमधील घातक आजारांच्या (Animal Disease) अचूक निदानासाठी प्रयोगशाळा तसेच दुभत्या जनावरांवरील उपचारासाठी नजीकच्या परिसरात अद्ययावत पशुवैद्यकीय सुविधा (Veterinary Service) उपलब्ध करून द्याव्यात.

दुभत्या जनावरांची संख्येपेक्षा दूध उत्पादन (Milk Production) वाढण्यासाठी प्रयत्न हवेत. प्रक्रिया पदार्थाच्या निर्मितीतून दुधाचे मूल्यवर्धन शक्य आहे.

कृत्रिम रेतन तंत्र तसेच पशुवैद्यकीय सुविधांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी दबाव गट तयार झाला पाहिजे प्रगतीसाठी सर्वांना हातात हात घालून काम करावे लागेल असा सूर पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयातील पशुवैद्यकीय पशुअनुवंश व पैदासशास्त्र विभाग आणि पाळीव प्राण्यांची जैवविविधता संवर्धन सोसायटी यांच्यातर्फे ग्रामीण उपजीविका संवर्धनासाठी पशू आनुवंशिक संसाधनांचे व्यवस्थापन या विषयावरील २० वी राष्ट्रीय परिषदेत गुरुवारी (ता. २३) आयोजित राज्यातील विविध जिल्ह्यांतील दूध उत्पादक शेतकरी - शास्त्रज्ञ चर्चासत्रात उमटला.

Animal Care
Milk Production: जास्त दूध देणारी कालवड मिळवण्यासाठी काय करावे?

चर्चासत्रामध्ये विस्तार संचालक डॉ. अनिल भिकाने, सहयोगी अधिष्ठाता डॉ. विवेक देशमुख, माजी अधिष्ठाता डॉ. अब्दुल समद, डॉ. माणिक धुमाळ, निवृत्त अतिरिक्त पशुसंवर्धन आयुक्त डॉ. सुनील राऊतमारे, डॉ. नितीन मार्कंडेय, डॉ. बाबासाहेब ठोंबरे, डॉ. दिनेशसिंह चौहाण, डॉ. गोविंद गोवणे, दूध उत्पादक शेतकरी श्रद्धा ढवण (जि. नगर), रंगनाथ फेरे (जि. उस्मानाबाद), रामेश्‍वर आहेर (जि. हिंगोली), शरद पाटील (जि. लातूर), सचिन वाघ (जि. सांगली) आदी सहभागी झाले होते.

डॉ.भिकाने म्हणाले, की दुधापासून प्रक्रिया पदार्थांची निर्मिती केल्या मूल्यवर्धन होऊन अधिक फायदा होईल. लाल कंधारी गोवंशच्या संवर्धनासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे.

डॉ. समद म्हणाले, की दुग्ध व्यवसायात चारा हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. चारा विकत घेऊन दुग्ध व्यवसाय परवडणारा असल्याचे ते म्हणाले

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com