Crop Damage : धान्य महोत्सवातील नुकसानग्रसतांना विम्याची प्रतीक्षा

Stormy Rain Damage : जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानावर २८ ते ३० एप्रिलदरम्यान कृषी विभागातर्फे आयोजित धान्य महोत्सवात धान्य विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांचे पाऊस, वादळाने नुकसान झाले.
Crop Damage
Crop DamageAgrowon

Crop Insurance Awaiting: जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानावर २८ ते ३० एप्रिलदरम्यान कृषी विभागातर्फे आयोजित धान्य महोत्सवात धान्य विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांचे पाऊस, वादळाने नुकसान झाले.

धान्याची नासाडी झाली. संबंधित शेतकऱ्यांसह त्यांच्या शेतमालाच्या नुकसानीसंबंधी विमा संरक्षण घेतले होते. नुकसानग्रस्तांना विमा परतावा कधी मिळेल, हा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे.

या महोत्सवापूर्वीपासून पाऊस सुरू होता. रोज जिल्ह्यात पाऊस, वादळ, गारपीट, असे थैमान ४ एप्रिलपासून सुरू होते. त्याबाबत हवामान विभाग व इतर यंत्रणा आपल्या नियोजनानुसार माहिती जारी करीत होत्या. परंतु पाऊस, वादळाने नुकसानीची कुठलीही शक्यता लक्षात न घेता धान्य महोत्सव सुरू झाला.

यावर प्रसार माध्यमांनी सुरवातीलाच टीका केली. परंतु कृषी विभागाने दुर्लक्ष केले. ताडपत्री व इतर कुठलीही व्यवस्था करण्यात आली नाही. ८० स्टॉल या महोत्सवात होते. महिला बचत गट, शेतकरी आदींनी धान्य विक्रीसाठी आणले. त्यात २८ रोजी पाऊस झाला.

Crop Damage
Crop Insurance Update : विमा परताव्यासाठी अपात्र तक्रारींची फेरतपासणी

तरीदेखील २९ रोजी हा महोत्सव पुढे न ढकलता सुरूच राहिला. त्यात २८ रोजी जोरदार वादळ, पाऊस झाला. त्यात महोत्सवासाठी लावलेला टेंट व शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेले गहू, हरभरा, दादर ज्वारी व इतर शेतमाल, बचत गटांच्या उत्पादनांचे मोठे नुकसान झाले.

कानळदा (ता.जळगाव) येथील शेतकरी मिलिंद वाघुळदे यांच्या दादर ज्वारीची नासाडी झाली असून, या ज्वारीला कोंब फुटले आहेत.

पिंपळनेर (ता.साक्री, जि.धुळे) येथील शेतकऱ्यांच्या तांदळाची पावसाने नासाडी झाली. धरणगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या गव्हाचीदेखील मोठी हानी झाली. पावसामुळे धान्य विक्रीच झाली नाही. पण मोठे नुकसान झाले.

या महोत्सवात सहभागी शेतकरी व त्यांच्या शेतमालासंबंधी विमा संरक्षण घेतले होते. यातून विमा परतावा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळण्याची अपेक्षा आहे. त्याबाबत काही शेतकऱ्यांनी जळगाव तालुका कृषी विभागात विचारणा केली आहे. पण समाधानकारक माहिती मिळत नसल्याची माहिती नुकसानग्रस्त शेतकरी मिलिंद वाघुळदे यांनी दिली.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने विमा परतावे मिळावेत. वेळखाऊपणा करू नये. कारण शेतकऱ्यांचे यापूर्वीच शेतमालाचे दर कमी असल्याने नुकसान होत आहे. कापूस पीक परवडलेले नाही. वित्तीय संकटे आहेत. यामुळे नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर विमा परतावा मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com