Electricity : विजेचे प्रश्‍न मार्गी लावा, अन्यथा सबस्टेशनला टाळे ठोकू

परिसरातील विविध गावच्या सरपंचांचा इशारा
Electricity
ElectricityAgrowon

महाळुंगे पडवळ, जि. पुणे : ‘‘श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग (ता. आंबेगाव) येथे महावितरण कंपनीचे (MSEB) ३३/११ केव्ही क्षमतेच्या सबस्टेशनमध्ये ५ एम.व्ही.ए. क्षमतेचा ट्रान्स्फॉर्मर २०१७ मध्ये बसविण्यात आला. त्यामध्ये साकोरे, सुलतानपूर, वडगाव काशिंबेग, वाळूंजवाडी आदी गावांसाठी स्वतंत्र फीडरची तरतूद केली. परंतु सहा वर्षे होऊनही अधिकाऱ्यांनी एकही फीडर चालू केला नाही. येत्या एक महिन्यात हा प्रश्‍न मार्गी न लागल्यास सबस्टेशनला टाळे ठोकून अधिकारी वर्गाला काळे फासले जाईल,’’ असा इशारा सरपंच अशोक मोढवे (Ashok Modhve)यांच्यासह विविध गावच्या सरपंचांनी दिला.

Electricity
Electricity : विद्युतनिर्मितीत शेतीचे टाकाऊ अवशेष वापरामुळे उत्पन्नाच्या संधी

श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग वीज उपकेंद्रावर विजेच्या प्रलंबित मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी सरपंच मोढवे, लांडेवाडीचे सरपंच अंकुश लांडे, श्री क्षेत्र वडगाव काशिंबेगचे सरपंच वैभव पोखरकर, वाळुंजवाडीचे सरपंच नवनाथ वाळुंज, उपसरपंच मयूर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. या वेळी अंकुश शेवाळे, राजेंद्र शेवाळे, बाळासाहेब गव्हाणे, सत्यवान शेटे, मोरेश्‍वर शेटे, बाळासाहेब पिंगळे, अनिल गाडे, जगन्नाथ गाडे, प्रकाश लोहोटे, सागर लवांडे, विजय लोहोटे, नवनाथ पिंगळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

या सबस्टेशनमध्ये इनकमिंग व आउटगोइंगचे काम ठेकेदाराने व्यवस्थित केले नसल्याने वारंवार साहित्य जळत आहे. सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष करून सबस्टेशनमधील इनकमिंग बायपास करून फीडरचे कनेक्शन सुरू केले जाते. रोहित्रावर क्षमतेपेक्षा जास्त लोड आल्याने वीजपुरवठा खंडित होतो.

विजेच्या कमी जास्त दाबामुळे घरातील उपकरणे जळून जाण्याच्या घटना घडल्या आहेत. गावठाण व शेतीपंप फीडर वेगळा करावा. आठ तास अखंडित वीज द्या. खंड झाल्यास ती वेळ वाढून द्यावी, अशी मागणी अंकुश लांडे, वैभव पोखरकर, नवनाथ वाळुंज या सरपंचांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com