Tendu Leaf : तेंदू पाने संकलन करणाऱ्या मजुरांना मजुरी देण्यास मान्यता

रक्कम वन विभागाकडे जमा झाल्यानंतर एक महिन्याच्या आत संबंधित तेंदू संकलनकर्त्यांना अदा करण्यात येईल.
Tendu Leaf
Tendu LeafAgrowon

Hingoli News : २०२२ च्या तेंदू हंगामापासून (Tendu Season) पुढे तेंदू पाने संकलनाद्वारे जमा होणाऱ्या संपूर्ण स्वामित्व शुल्काची (Royalty) रक्कम कोणत्याही प्रकारची वजा न करता संबंधित तेंदू पाने संकलन (Tendu Leaf Collection) करणाऱ्या मजुरांना प्रोत्साहनात्मक मजुरी वितरणास ३१ जानेवारी २०२३ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

रक्कम वन विभागाकडे (Forest Department) जमा झाल्यानंतर एक महिन्याच्या आत संबंधित तेंदू संकलनकर्त्यांना अदा करण्यात येईल. त्यामुळे तेंदू संकलन कर्त्या मजुरांच्या उत्पन्नात भर पडण्यास मदत होईल, अशी माहिती हिंगोली येथील विभागीय वन अधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आली.

Tendu Leaf
Nutrient Management : पान, देठ परीक्षणाचे तंत्र जाणून करा अन्नद्रव्यांचे नियोजन

प्रचलित धोरणानुसार तेंदू पाने संकलनासाठी ई-लिलाव प्रक्रियेतून प्राप्त होणाऱ्या स्वामित्व शुल्कातून तेंदूच्या लेखाशीर्षांतर्गत झालेला वेतन, मजुरी, कार्यालयीन खर्च इत्यादी प्रशासकीय खर्च अधिक १२ टक्के या प्रमाणे वजा करून त्या हंगामाची तेंदू संकलनकर्त्यांना अदा करावयाची प्रोत्साहनार्थ मजुरी ठरवण्यात येते.

तथापि, तेंदू संकलनाचा कालावधी एक महिन्याचा असताना प्रशासकीय खर्च संपूर्ण वर्षासाठी वजा करणे, वन विभागास तेंदू विक्रीतून कमी दर मिळण्याबाबत स्थानिकांमध्ये निर्माण होणारी नाराजी, तेंदू संकलनकर्त्यांना एक वर्ष उशिराने प्रोत्साहनात्मक मजुरी मिळणे इत्यादी नकारात्मक बाबींवर तोडगा काढणे गरजेचे आहे.

Tendu Leaf
मनाचे पान हलते चार शब्दांनी

स्वामित्व शुल्काची रक्कम मजुरांना प्रोत्साहनात्मक मजुरी म्हणून देण्यासाठी १ नोव्हेंबर २००७ च्या तेंदू संकलन धोरणात बदल करण्यासाठी मंत्रिमंडळापुढे मान्यतेसाठी सादर केला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com