Jaljeevan Mission: जलजीवन मिशनच्या कामांची बिले ८ दिवसांतच मिळणार

आठ दिवसांमध्ये कोणकोणत्या विभागांत कोणत्या टेबलावरून फाइलचा प्रवास होईल, हेही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी परिपत्रकात स्पष्ट केले आहे.
Jaljeevan Mission
Jaljeevan Mission Agrowon

Nashik News : जलजीवन मिशनमधील (Jaljeevan Mission) पाणीपुरवठा योजनांच्या (Water Supply Scheme) कामांची देयके ठेकेदारांना आता आठ दिवसांत मिळणार आहे.

याबाबत, मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी बिले अदा करण्यासाठी पाणीपुरवठा, लेखा व वित्त विभाग, जलजीवन मिशन प्रकल्प संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयांमध्ये देयकांची फाइल किती दिवस राहील, याचे वेळापत्रकच निश्‍चित केले आहे.

यामुळे फाइल या तिन्ही विभागांतील केवळ २३ टेबलांवर फिरणार आहे.

जिल्हा परिषदेतर्फे जलजीवन मिशनमधील १,४४३ कोटींच्या १,२८२ कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात कार्यारंभ आदेश दिलेल्या कामांची देयके मिळावीत यासाठी ठेकेदारांनी देयके सादर केले आहेत.

Jaljeevan Mission
Jal Jeevan Mission : रत्नागिरी जिल्ह्यातील ५६ गावे ‘हर घर जल’च्या घोषित टप्प्यावर

मात्र देयके मिळण्यासाठी फाइल तब्बल ४२ टेबलांवर फिरत असल्याने देयकांना उशीर होत असल्याची तक्रार अशिमा मित्तल यांच्याकडे करण्यात आली होती. त्याची दखल घेत मित्तल यांनी जलजीवन मिशनच्या कामांची देयके वेळेत मिळावीत, यासाठी एक वेळापत्रक तयार करून जाहीर केले आहे.

त्यानुसार देयके तयार करण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला तीन दिवस, लेखा व वित्त विभागाकडे दोन दिवस, प्रकल्प संचालकांकडे एक दिवस, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे एक दिवस व पुन्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे एक दिवस, असा फायलींचा प्रवास ठरवून दिला आहे.

या आठ दिवसांमध्ये कोणकोणत्या विभागांत कोणत्या टेबलावरून फाइलचा प्रवास होईल, हेही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी परिपत्रकात स्पष्ट केले आहे. या परिपत्रकानुसार देयके देण्यात यावीत, अशा सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.

जास्त कालावधी का? वेळापत्रकानुसार ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला चार दिवस देण्यात आले आहेत. ती अव्यवहार्य असल्याची जिल्हा परिषदेत चर्चा आहे.

Jaljeevan Mission
Jal Jeevan Mission : ‘जलजीवन’मध्ये बुलडाण्यातील १,२५६ गावे

दुसरीकडे देयके देण्यासाठी सर्व संबंधित विभागांचे वेळापत्रक निश्‍चित करून आठ दिवसांमध्ये देयक देण्याचे धोरण निश्‍चित केले असले, तरी या देयकांच्या फायलींमध्ये काही त्रुटी असल्यास त्यांच्या निराकरण करण्यासाठी लागणाऱ्या कालावधीचा काहीही विचार करण्यात आला नसल्याचे दिसत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com