Sangli APMC Election Update : सांगली जिल्ह्यात बाजार समिती निवडणुकीचा प्रचार शिगेला

Krishi Utpanna Bajar Samiti News : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसह सहा बाजार समितीच्या निवडणुका अवघ्या चार दिवसांवर आल्याने प्रचार शिगेला पोहोचला आहे.
Sangli APMC Election News
Sangli APMC Election NewsAgrowon

Sangli Election : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसह (Sangli Agriculture Produce Market Committee) सहा बाजार समितीच्या निवडणुका अवघ्या चार दिवसांवर आल्याने प्रचार शिगेला पोहोचला आहे. बैठका, भेटीगाठी यावर उमेदवारांनी भर दिला आहे. त्यातच ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, ते प्रचारात सामील झाले नाहीत.

त्यामुळे त्यांची मनधरणीही करण्याचे काम राजकीय नेते करत असल्याचे चित्र आहे. कार्यकर्त्यांची नाराजी; नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

सांगली बाजार समितीसाठी दोन्ही पॅनेल जाहीर करण्यास इच्छुकांच्या मोठ्या संख्येमुळे विलंब लागला. उमेदवारी अर्ज माघारीनंतर दोन्ही पॅनेलच्या उमेदवार याद्या जाहीर झाल्या. उमेदवारी पॅनेलची यादी जाहीर झाल्यानंतर भाजपात मोठा वाद उफाळला.

त्यानंतर त्या वादावर पडदा पडला. त्यामुळे कार्यकर्ते रिचार्ज झाले. दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते प्रचाराची धुरा सांभाळत आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता काबीज करण्यासाठी भाजप गावोगावात जाऊन प्रचार करू लागले आहेत.

Sangli APMC Election News
Jalgaon Apmc Election : बाजार समितीत निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यानंतर आता पाडापाडीच्या राजकारणाचा डाव

महाविकास आघाडीचे नेतृत्व राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील, आमदार डॉ. विश्‍वजित कदम, आमदार विक्रम सावंत, विशाल पाटील, जयश्री पाटील करीत आहेत. भाजपच्या पॅनेलचे नेतृत्व पालकमंत्री सुरेश खाडे, भाजपचे नेते खासदार संजय पाटील, विलासराव जगताप आदी करीत आहेत.

क्रॉस व्होटिंगचीही अनेक उमेदवारांना भीती सतावतेय. तिन्ही तालुक्यांतील हवे असलेले उमेदवार निवडून आणण्यासाठी लाणणारी ताकद काही नेते पुरवत असल्याची चर्चा आहे.

प्रचारासाठी अल्पकाळ व कार्यक्षेत्र मोठे असल्याने महाविकास आघाडी व भाजप दोन्ही पॅनलचे नेते बैठका आणि सभा घेण्यासाठी मैदानात उतरले आहेत. जत, कवठे महांकाळ, मिरज मध्ये नेतेमंडळी सभा, बैठकांना उपस्थिती लावत आहेत.

तासगावमध्ये विरोधकांची एकी, राष्ट्रवादीही सावध

तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक प्रचार सुरुवातीपासूनच रंगू लागला आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दुसरीकडे, काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद उघडकीस आले आहेत. याही निवडणुकीत नेहमीप्रमाणे शेतकरीहित प्रचाराचा विषय बनला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक यंदा चित्र-विचित्र राजकीय समीकरणांमुळे चर्चेत आली आहे. एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस, तर दुसऱ्या बाजूला भाजपसह काँग्रेस, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष, राष्ट्रवादीतील नाराज, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) अशी तालुक्यातील दिग्गज नेत्यांची मांदियाळी असे चित्र आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com