Farmer Agitation : सातारा जिल्ह्यात बुधवारी ‘स्वाभिमानी’चे चक्काजाम आंदोलन

सातारा, कराड,फलटण, वडूज येथे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी दिले.
Raju Shetti
Raju ShettiAgrowon

Raju Shetti News सातारा ः शेतकऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी संदर्भात ऊस वाहतूकदार (Sugarcane Transporter) टोळी, मुकादम यांनी केलेली फसवणूक यांसह अनेक प्रश्नांवर वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा प्रशासन लक्ष देत नाही.

त्यामुळे बुधवारी (ता.२२) जिल्ह्यातील सातारा, कराड,फलटण, वडूज येथे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या मार्गदर्शनाखाली चक्काजाम आंदोलन (Chakkajam Protest) करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी दिले.

Raju Shetti
Raju Shetti : मंत्र्यांच्या आश्‍वासनानंतर बिऱ्हाड आंदोलन मागे

महावितरणाने बेकायदेशीर शेतीपंपाची वीजबील वसुली मोहीम तत्काळ थांबवावी, तसेच वीजतोडणी तत्काळ सुरळीत करावी, शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज उपलब्ध देण्यात यावी, वीज दरवाढ प्रस्ताव रद्द करावा, १५ दिवसांत ऊसबिल न देणाऱ्या कारखान्यांवर कायदेशीर कारवाई करावी. टोळी-मुकादम यांच्याकडून वाहतूकदार शेतकरी यांची करोडो रुपयांची फसवणूक झाली आहे.

Raju Shetti
Raju Shetty : राजू शेट्टी यांनी घेतली शेतकऱ्यांची भेट

यावर शासनस्तरावर निर्णय घेऊन सर्व ऊस वाहतूकदार यांना न्याय द्यावा, लवकरात लवकर वजन काटे ऑनलाइन करण्यात यावेत, ५० हजार रुपयांचे प्रोत्साहानपर अनुदान विनाअट तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, तोडणी कामगारांकडून ऊस तोडण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी लूट चालू असून कारखाना प्रशासन सुद्धा या लुटीत सहभागी आहे.

या सगळ्याची चौकशी करून प्रशासन व टोळ्यांवर कारवाई करून शेतकऱ्यांना त्यांचे पैसे परत करावेत, आदी मागण्या करण्यात आल्या. या वेळी जिल्हाध्यक्ष श्री. शेळके, अर्जुनभाऊ साळुंखे, कराड पाचवड फाटा येथे पक्षाध्यक्ष देवानंद पाटील, जिल्हाउपाध्यक्ष दादासाहेब यादव, वडूज येथे राज्य प्रवक्ते अनिल पवार, युवा जिल्हाध्यक्ष तानाजी देशमुख, फलटण- पूर्व जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, तालुका अध्यक्ष नितीन यादव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com