
Solapur News : दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमा-सीना जोड कालवा, बंधारे दुरुस्तीसह कालव्याच्या दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशा सूचना आमदार सुभाष देशमुख (MLA Subhash Deshmukh) यांनी जलसंधारण विभागाच्या (Department of Water Conservation) आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या.
तसेच प्रस्तावीत वडापूर बॅरेजसह अन्य ठिकाणचे बॅरेज, संरक्षक भिंती व घाट बांधणे, होटगी तलाव व कुंडल संगमच्या पर्यटनस्थळ विकासाबाबतही त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
भीमा व सीना नदीवर बांधण्यात आलेले कोल्हापूर पद्धतीचे बंधारे दगडी बांधकामातील आहेत. त्याच्या पायातून गळती होत असल्याने ३४ ते ८० स्तंभाची कामे नव्याने काँक्रीटमध्ये करण्याची शासनाकडे मागणी केली असून, त्याचे प्रस्ताव तातडीने पाठवावेत, पाणी अडविण्यासाठी वापरात असलेले लोखंडी बर्गे गंजून खराब झाले आहेत.
त्यासाठी नव्या लोखंडी बर्ग्यासाठी आढावा घ्यावा, देगाव जलसेतूचे रेल्वेमार्गावरील काम जूनअखेर कामपूर्ण करून कालव्यातून खरीप हंगामासाठी पाणी सोडून चाचणी घेण्याचे नियोजन करावे, उजनीचे शाखा कालवा दुरुस्ती व स्वच्छता करावी, यांत्रिकी विभागाची मशिनरी वापरून विशेष मोहीम हाती घेऊन एप्रिलअखेर कालवे स्वच्छ करावेत, दबलेले आणि खचलेले भराव मजबूत करावेत, असेही आमदार देशमुख म्हणाले.
होटगी तलाव, हत्तरसंग कुडलचा तीर्थक्षेत्र विकास
होटगी तलाव परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसित करायचा आहे. त्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे.
ही बाब विचारात घेऊन जलसंपदा विभागाने तातडीने पर्यटन विभागास ना हरकत प्रमाणपत्र द्यावे, हत्तरसंग-कुडल संगम येथील देवस्थान तीर्थक्षेत्र ठिकाणी घाट बांधणीसाठी प्रस्ताव तयार करावा, ही दोन्ही तीर्थक्षेत्र अधिकाधिक विकसित होतील, त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, असेही ते म्हणाले.
या बैठकीस लोकमंगल बँकेचे संचालक प्रसाद कांबळे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे, कार्यकारी अभियंता नारायण जोशी, रमेश वाडकर, मोहन जाधवर, स्नेहल गावडे उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.