
Sangli Water Supply News : शिराळा व वाळवा तालुक्याच्या बहुचर्चित असणाऱ्या वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या रेड ते ढगेवाडी व रेड ते मरळनाथपूर आणि सुरूल येथील बंदिस्त पाइपलाइनच्या (pipeline) पाण्याच्या चाचणीचे काम सुरू झाले आहे.
गतवर्षी एप्रिल महिन्यात मानकरवाडी ते रेड या १२ किलोमीटरच्या बंदिस्त पाइपलाइनच्या चाचणीचे काम झाले आहे.
त्यानंतर त्या पाण्याचे पूजन तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांच्या हस्ते झाले. ते पाणी रेठरे धरणात येत असल्याने त्या परिसरातील शेतीला त्याचा फायदा होत आहे.
गतवर्षी मानकरवाडी ते रेड या १२ किलोमीटर बंदिस्त पाइपलाइनची चाचणी यशस्वी झाली आहे. आता रेड ते ढगेवाडी या सात किलोमीटर व रेड ते मरळनाथपूर या १२ किलोमीटर आणि सुरूल या पाच किलोमीटरच्या बंदिस्त पाइपलाइनची चाचणी घेण्याचे काम सुरू आहे.
यासाठी वारणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता डी. डी. शिंदे, सहायक अभियंता दीपक परळे, उपअभियंता अमोल कमलाकर, उपअभियंता पी. बी. बंडगर, व्ही. एम. पाटील आदी प्रयत्नशील आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.