Crop Damage Survey : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात नुकसानीचे पंचनामे सुरू

कृषी विभागाच्या विभागातील रब्बी हंगामातील सरासरी क्षेत्र १३ लाख ६३ हजार ९३१ हेक्टर होते.
Crop Damage
Crop DamageAgrowon

Latur Agriculture News : विभागात १७ ते १९ मार्च या कालावधीत लातूर विभागाअंतर्गत पाच जिल्ह्यातील विविध तालुक्यात वादळी पावसामुळे रब्बी पिकाच्या झालेल्या नुकसानीचे (Rabi Crop Damage) पंचनामे क्षेत्रीय स्तरावर सुरू, असल्याची माहिती कृषी विभागाकडून (Agriculture Department) देण्यात आली.

कृषी विभागाच्या माहितीनुसार, की लातूर जिल्ह्यातील रेणापूर, लातूर, निलंगा, शिरूरअनंतपाळ, चाकूर, उदगीर, अहमदपूर, देवणी व जळकोट तालुक्यात, उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा, उस्मानाबाद, कळंब, व तुळजापूर तालुक्यात, नांदेड जिल्ह्यातील मुदखेड, नांदेड, अर्धापूर, किनवट, भोकर, हदगाव, लोहा व कंधार तालुक्यात, परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, परभणी, सोनपेठ,पालम जिंतूर व पूर्णा तालुक्यात व हिंगोली या जिल्ह्यात वादळी पाऊस व गारपिटीमुळे काढणीस आलेल्या रब्बी ज्वारी, हरभरा, गहू व करडई या पिकांचे नुकसान झाले असून क्षेत्रीय स्तरावर नुकसानीचे पंचनामे सूरू असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

Crop Damage
Crop Damage : गारपिटीमुळे साडेसात हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान

कृषी विभागाच्या विभागातील रब्बी हंगामातील सरासरी क्षेत्र १३ लाख ६३ हजार ९३१ हेक्टर होते. प्रत्यक्षात १६ लाख ७१ हजार ६८२ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे सरासरीच्या १२३ टक्के क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली होती.

विभागातील रब्बी पीक स्थिती(स्रोत कृषी विभाग)

रब्बी ज्वारी- पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ७१ हजार ८५७ हेक्टर असून २९७९०७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. त्याची टक्केवारी ८० टक्के आहे. पिक सद्या पक्वतेच्या अवस्थेत आहे. रब्बी ज्वारी पिकाची सध्या काढणी सुरु असून ५० ते ६० टक्के काढणी पूर्ण झाली आहे.

गहू : पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १५६५१९ हेक्टर असून १५४२१६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. त्याची टक्केवारी ९९ टक्के आहे. पीक सद्या पक्वतेच्या अवस्थेत आहे. पिकाची सध्या काढणी सुरु असून ६५ ते ७० टक्के काढणी पूर्ण झालेली आहे.

हरभरा : पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ७८६१२४ हेक्टर असून प्रत्यक्षात ११५९८३९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.त्याची टक्केवारी १४८ टक्के आहे. पीक सद्या पक्वतेच्या अवस्थेत आहे. पिकाची सध्या काढणी सुरु असून ८५ ते ९० टक्के काढणी पूर्ण झालेली आहे.

रब्बी मका : पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १७९७१ हेक्टर असून १७७६४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्याची टक्केवारी ९९ टक्के आहे. पीक सद्या कणसे पक्व होण्याच्या अवस्थेत आहे.

करडई : पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १९५३१ हेक्टर असून २३९४८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून त्याची टक्केवारी १२३ टक्के आहे. पीक सद्या पक्वतेच्या अवस्थेत असून काही ठिकाणी पिकाची काढणी सुरु असून ८० ते ८५ टक्के काढणी पूर्ण झालेली आहे.

जिल्हानिहाय बाधित अंदाजे क्षेत्र (हेक्टरमध्ये)

लातूर - ११८९१

धाराशिव - १५२५.९०

नांदेड - २४६१३

परभणी - ५९९८.९०

हिंगोली - ५६०४

Crop Damage
Vegetable Crop damage : टोमॅटो, वांगी उत्पादकांना फटका

झालेले पंचनामे २३ मार्च अखेर (हेक्टरमध्ये)

लातूर - ६२३१

धाराशिव - ८७९.२३

नांदेड - ६३८३

परभणी - ३९०७

हिंगोली - २६०४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com