Orange Orchard Damage : वऱ्हाडात संत्रा बागांचे नुकसान

संग्रामपूर, जळगाव जामोद तालुक्यांत वादळामुळे नुकसान झाले.
Orange Orchard Damage
Orange Orchard DamageAgrowon

Akola News : जिल्ह्यात सोमवार (ता. ६) व मंगळवार (ता. ७) झालेल्या अवकाळी पावसाचा पुन्हा एकदा फटका बसला आहे. प्रामुख्याने बुलडाणा जिल्ह्यात (Buldana District) या पावसाने धुमाकूळ घातल्याने शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.

सध्या रब्बीतील गहू, हरभरा, ज्वारी, मका ही पिके उभी आहेत. गव्हाचे पीक अनेक ठिकाणी जमीनदोस्त झाले. सोंगणी केलेला हरभरा ओला झाला.

ज्वारी, मक्याची पीकही जमिनीवर लोळले आहे. या रब्बी पिकांसह संत्रा बागांमध्ये नुकसान झाले. संत्रा बागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे फळगळती प्रचंड झाली.

Orange Orchard Damage
Orange Processing : पतंजलीच्या संत्रा प्रक्रिया प्रकल्पाला अखेर मुहूर्त

या जिल्ह्यात प्रामुख्याने नांदुरा तालुक्यात मका, गहू, हरभरा, कांदा,ज्वारी या पिकांचे सुमारे ७७५ हेक्टरवर वादळी वारा, पावसामुळे नुकसान झाल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे. मोताळा तालुक्यात रब्बी ज्वारी, मक्याचे पीक बऱ्याच ठिकाणी जमीनदोस्त झाले.

संग्रामपूर, जळगाव जामोद तालुक्यांत वादळामुळे नुकसान झाले. खामगाव, शेगाव तालुक्यांतही रब्बी पिकांना फटका बसला. उर्वरित तालुक्यांत कुठेही मोठे नुकसान झालेले नसल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

वीज पडून १५ ते १६ मेंढ्या दगावल्याचा प्रकार जिल्ह्यात घडलेला आहे. जिल्ह्यात इतरही तालुक्यांत या वादळाने पीक नुकसान झालेले आहे. मात्र त्याचे अहवाल प्राप्त नसल्याने जिल्हा यंत्रणांकडे माहिती उपलब्ध होऊ शकली नव्हती.

अकोला जिल्ह्यात तेल्हारामध्ये नुकसान

दोन दिवसांतील या आपत्तीचा फटका जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात पिकांना बसला. आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार ११५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.

यात कांदा, गहू, हरभरा पिकाचे नुकसान झाल्याचे कृषी विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले. उर्वरित कुठल्याही तालुक्यात मोठ्या नुकसानाची नोंद नसल्याची माहितीसुद्धा देण्यात आली.

Orange Orchard Damage
Maharashtra Budget Session 2023 : विधानसभेत अवकाळी पाऊस, कांदा खरेदीवरून खडाजंगी

वाशीम जिल्ह्यात २०० हेक्टरला फटका

पाऊस व वादळामुळे वाशीम जिल्ह्यात कारंजा, मानोरा, मालेगाव, रिसोड तालुक्यांत २०४ हेक्टरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात संत्रा व गहू पिकांचे नुकसान झालेले आहे.

प्रामुख्याने कारंजा तालुक्यात ४५ हेक्टर, मानोरा तालुक्यात ४९, मालेगाव ९५ व रिसोड तालुक्यात १४ हेक्टरवर नुकसान दाखवण्यात आले. मंगरूळपीर तालुक्यात वीज पडून एका वासराचा मृत्यू झाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com