Onion Processing : कांद्यातील संधी हेरण्यासाठी सर्वांनी पुढे यावे

कांदा व लसूण पिकात प्रक्रिया करण्यासंबंधी सकारात्मक काम सुरू आहे. जैन उद्योग समूहाने यासंबंधी शेतकऱ्यांशी करार करून कांदा लागवडीसंबंधी कार्यवाही सुरू केली आहे.
Onion
OnionAgrowon

Jalgaon News : ‘‘कांदा पिकाची लागवड (Onion Cultivation) देशात अधिक आहे. परंतु निर्जलीकरण व इतर उद्योग कमी आहेत. तसेच पुनर्लागवड व इतर कार्यवाहीसंबंधी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार शेतकऱ्यांपर्यंत गतीने झालेला नाही.

हा प्रसार गतीने व्हावा आणि कांदा पिकाचा (onion Crop) खर्च कमी करून शेतकऱ्यांना लाभ व्हायला हवा. या पिकात मोठी संधी असून, ही संधी हेरण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज आहे,’’ असा सूर जळगाव येथील जैन हिल्सवर आयोजित राष्ट्रीय कांदा व लसूण चर्चासत्रात उमटला.

मंगळवारी (ता.१४) या चर्चासत्राचा चौथा दिवस होता. सकाळच्या सत्रात प्रक्रिया व मूल्यवर्धन याबाबत तज्ज्ञ, शास्त्रज्ञांनी पेपर व मौखिक सादरीकरण केले.

डॉ. डी. एन. कुलकर्णी अध्यक्षस्थानी होते. तर मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. डी. पी. वासकर सहअध्यक्ष होते.

Onion
Onion Rate : ...अन्यथा कांदा उत्पादकांचा उद्रेक होईल

डॉ. कुलकर्णी यांनी कांदा व लसूण प्रक्रिया उद्योगाबाबत पेपर सादरीकरण केले. ते म्हणाले, ‘‘कांदा व लसूण पिकात प्रक्रिया करण्यासंबंधी सकारात्मक काम सुरू आहे. जैन उद्योग समूहाने यासंबंधी शेतकऱ्यांशी करार करून कांदा लागवडीसंबंधी कार्यवाही सुरू केली आहे.

कांदा खरेदी व त्यावर प्रक्रिया केली जाते. मूल्यवर्धनामुळे कांदा शेतीला आधार मिळाला आहे. पांढरा कांदा करार शेती यशस्वी झाली आहे. त्याचे चांगले परिणाम दिसतात.’’

‘जैन फार्म फ्रेश फूड लि.’चे सुनील गुप्ता म्हणाले, ‘‘कांदा प्रक्रिया, निर्जलीकरण प्रक्रियेत प्रतवारी, स्वच्छता आदी मुद्दे महत्त्वाचे आहेत. यासाठी गुणवत्ता महत्त्वाची आहे. जैन व्हॅली येथील कांदा प्रक्रिया केंद्रात सर्व गुणवत्ता व इतर बाबींबाबत कटाक्ष आहे.

कारण गुणवत्तापूर्ण कच्चा माल असायला हवा. तसेच त्यावर प्रक्रिया करीत असतानाही स्वच्छता व इतर बाबींची काळजी घेतली जाते. अन्यथा निर्जलीकरण केलेल्या बाबींमध्ये अनावश्यक घटक जाऊ शकतात. त्यामुळे तपासण्या, आंतरराष्ट्रीय मानके याबाबत कार्यवाही करायची असते.’’

जैन इंटरनॅशनल फूड्स लि. लंडन (यु.के.) चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुवन शर्मा म्हणाले, ‘‘कांदा व लसूण निर्जलीकरण अमेरिकेतून पुढे आले. तेथे पहिल्या महायुद्धाच्या काळात सैन्याला ताजा कांदा पोचविण्यासंबंधी अडचणी आल्या.

यातून कांदा व लसणातील निर्जलीकरणासंबंधी काम सुरू झाले. १९५० ते १९७० च्या काळात कांदा व लसणाच्या प्रक्रियेतील यंत्रणा विकसित झाली. त्याचा प्रसारही झाला. कांदा प्रक्रिया उद्योग वाढला आहे. त्यात भारताचा वाटा २१ टक्के आहे.

लसूण प्रक्रिया उद्योगात चीनचा वाटा ९० टक्के आहे. तसेच ब्रिटनचा वाटा कांदा प्रक्रिया उद्योगात अधिक आहे. देशात हा उद्योग आणखी वाढेल, यासंबंधी संधी आहे. पांढऱ्या कांद्यावर देशात अधिकची प्रक्रिया केली जाते.’’

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com