Honey Production : साताऱ्याच्या रोहीणी पाटील यांची उत्कृष्ट मधनिर्मिती

सातारा जिल्ह्याची मधनिर्मितीतून स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात अनेक शेतकऱ्यांच्या हात आहे. यापैकीच रोहिणीताई पाटील एक. गेल्या नऊ वर्षांपासून रोहिणीताई मधनिर्मिती करत आहेत. त्यास प्रक्रियेची जोड देत ‘कृषिकन्या उद्योग समूह’ स्थापन करून मधाचे ब्रॅडिंग, पॅकिंग करत आहेत.
Beekeeping
BeekeepingAgrowon

Beekeeping Update : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुका हा डोंगराळ भाग वनसंपदेने नटला आहे. तालुक्यातील नाडे-नवारस्ता गावातील रोहिणी प्रकाश पाटील या प्रयोगशील महिला शेतकरी. पती नोकरी करत असल्याने शेतीची संपूर्ण जबाबदारी रोहिणीताई पाहतात. कुटुंबाची दोन एकर शेती.

जमीनधारणा कमी असल्याने उत्पन्नवाढीसाठी त्यांनी शेतीपूरक व्यवसायाचा शोध सुरू केला. दरम्यान, बचत गट उभारणीसाठी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्यासोबत झालेल्या चर्चेतून मधमाशीपालनाला पाटण तालुक्यात चांगला वाव असून, बाजारपेठेतही संधी असल्याचे लक्षात आले.

त्यादृष्टीने रोहिणीताईंनी मधमाशीपालनाचा अभ्यास सुरू केला. त्यासाठी ऐश्‍वर्यादेवी पाटणकर आणि रोहिणीताई यांच्यासह १४ महिलांनी मधमाशीपालनाचे रितसर प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणात मधमाशीपालनातील बारकावे, धोके, प्रक्रिया, संधी इत्यादी विषयी सविस्तर माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी व्यवसायास प्रारंभ केला.

रोहिणीताईंना व्यवसाय करताना मधमाश्‍या पेट्या भरणे ही प्रमुख समस्या असल्याचे जाणवले. यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन मधमाश्‍या पेट्या स्वतः तयार करण्याचे ठरविले.

सुरुवातीच्या काळात नव्याने पेटी भरताना मधमाश्‍यांनी चावे घेतल्यामुळे चेहरा, त्वचेवर सूज यायची. तरी मोठ्या हिमतीने रोहिणीताईंनी मधमाशीपालनाचे काम सुरू ठेवले.

Beekeeping
Beekeeping Business : महाराष्ट्रात मधमाशी पालन व्यवसायात मोठी संधी

राणीमाशी ओळखण्यापासून ते मधमाश्‍यांची वसाहत तयार करण्यास सुरुवात केली. मधमाश्यांची वसाहत यशस्वी झाल्यावर रोहिणीताईंनी स्वतःच्या ५० पेट्या गावाजवळील जंगलात ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यात टप्प्याटप्प्याने यश मिळत गेले. जंगलात पेट्या ठेवल्यामुळे सेंद्रिय मध मिळण्यास मदत होते.

सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यांत मधमाश्‍यांची वसाहत केली जाते आणि जानेवारीत जंगलात सावलीमध्ये पेट्या ठेवल्या जातात. पेट्ट्यांना मुंग्या लागू नये यासाठी विशेष काळजी घेतली जाते. फेब्रुवारी, एप्रिल महिन्यांत पेटीतील मधाचे संकलन केले जाते.

सुरुवातीच्या काळात वर्षभरात २०० किलो मध उत्पादन मिळाले. त्यानंतर त्यात वाढ होत गेली. सध्या वर्षाकाठी ३०० ते ४०० किलो मधनिर्मिती होते. एका पेटीतून एका वर्षात सरासरी ७ किलो मध मिळतो.

नवव्यावसायिकांना मार्गदर्शन

मधमाशीपालन व्यवसायात नव्याने येणाऱ्या शेतकऱ्यांना सहकार्याची भूमिका रोहिणीताईंनी कायम ठेवली आहे. या व्यवसायात वसाहत तयार करणे अवघड जाते. अशावेळी रोहिणीताई शेतकऱ्यांना मदत म्हणून मधमाशांची वसाहत असलेल्या पेट्या तयार करून देतात. वसाहत तयार झालेल्या पेट्या देताना संबंधित शेतकऱ्यांना राणीमाशी आणि इतर मधमाश्‍यांचे व्यवस्थापन कसे करावे, याबाबत सविस्तर माहिती देतात.

पुरस्कारांनी सन्मान

रोहिणीताईंनी मध व्यवसायात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मधनिर्मितीतील कामागिरीसाठी रोहिणीताईंना पावर वूमन ॲवॉर्ड, बिझनेस वूमन ॲवॉर्ड, गूगल बिझनेस रिंग स्टार ॲवॉर्ड, श्रीनिवास पाटील फाउंडेशन कृषी लक्ष्मी पुरस्कार, पाटण तालुका सुवर्णकन्या पुरस्कार, महाराष्ट्राची नवदुर्गा सन्मानपत्र, बसवंत मधमाशी उद्यान महिला उद्योजिका, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट कॉलेज, बारामती यांनी सन्मानपत्र देऊन सन्मानित केले आहे.

Beekeeping
Beekeeping Training : हिमाचल मधील अधिकाऱ्यांनी घेतले मधमाशीपालनाचे प्रशिक्षण

‘फॉरेस्ट हनी’ ब्रॅण्डने विक्री

बाजारपेठेत मधाला चांगला दर मिळण्यासाठी ब्रॅण्डिंग, पॅकिंग महत्त्वाचे आहे. त्यासाठी रोहिणीताईंनी मध उद्योगाची ‘एफएसएसएआय’ मध्ये नोंदणी करून घेतली. मधाचा साठवण कालावधी वाढविण्यासाठी ‘कृषिकन्या उद्योग समूह’ स्थापन करून मधावर प्रक्रिया करण्यास सुरुवात केली.

या समूहामार्फत मध संकलनापासून पॅकिंगपर्यंतची सर्व यंत्रणा स्वतःची उभी केली आहे. उत्पादित गुणवत्तापूर्ण मधाची बाजारपेठेत वेगळी ओळख तयार होण्यासाठी ‘फॉरेस्ट हनी’ हा ब्रॅण्ड तयार केला.

बहुतांश मध पाटण खोऱ्यातील जंगलातून गोळा संकलित होत असल्याने चव आणि गुणवत्ताही चांगली आहे. बाजारपेठेत ५०० ग्रॅम मध बाटली ५०० रुपये तर २०० ग्रॅम मध बाटली २५० रुपये या दराने विक्री केली जाते.

संपर्क - रोहिणी पाटील ७५८८६८५७३७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com