APMC Election : बारा बाजार समित्यांची अंतिम यादी जाहीर

प्रत्येक बाजार समितीत निवडून द्यावयाच्या १८ संचालकांसाठी एकूण २० हजार ९०३ मतदार मतदान करणार आहेत.
APMC
APMCAgrowon

Amravati News : जिल्ह्यातील बारा बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी (Election) मतदारांची अंतिम यादी सोमवारी (ता. २०) जाहीर करण्यात आली.

प्रत्येक बाजार समितीत निवडून द्यावयाच्या १८ संचालकांसाठी एकूण २० हजार ९०३ मतदार मतदान करणार आहेत. येत्या दोन दिवसांत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार असल्याचे सहकार विभागातून सांगण्यात आले.

जिल्ह्यातील अमरावतीसह धामणगावरेल्वे, दर्यापूर, अचलपूर, चांदूररेल्वे, चांदूरबाजार, नांदगावखंडेश्वर, मोर्शी, अंजनगावसुर्जी, वरुड, तिवसा व धारणी या बाजार समितीच्या निवडणुका प्रस्तावित आहेत.

APMC
APMC Election : बाजार समिती निवडणुकांमध्ये शेतकरी उमेदवारीवरून संभ्रम

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्या ३० एप्रिलपर्यंत घेणे आवश्यक आहेत. त्या दृष्टिकोनातून निवडणूकपूर्व कार्यक्रम आता आटोपला आहे. आक्षेप व सुनावणी अंतिम मतदारांची अंतिम यादी जिल्हा उपनिबंधकांनी जाहीर केली आहे.

प्रत्येक बाजार समितीत १८ संचालक निवडून द्यावयाचे आहेत. यामध्ये सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून अकरा, ग्रामपंचायत मतदारसंघातून चार, व्यापारी-अडतेमधून दोन व हमाल-मापारी मतदारसंघातून एका संचालकाचा समावेश आहे.

अंतिम मतदारयादी जाहीर झाल्याने आता सहकार क्षेत्रातील धुरिणांचे लक्ष निवडणूक कार्यक्रमाकडे लागले आहे. राज्य निवडणूक प्राधिकरण त्यासाठी येत्या दोन दिवसांत निर्णय घेणार असून कार्यक्रम जाहीर करणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून सांगण्यात आले.

APMC
Buldana APMC : चोरीच्या शेतीमालाची विक्री होत असल्याचा संशय

असे आहेत मतदार...

बाजार समिती - सेवा - ग्रामपंचायत - हमाल मापारी - व्यापारी अडते

अमरावती - १०४० - ८६०- ५४२- १०७०

दर्यापूर- ९६४- ५१४- १७६ - १३५

अचलपूर- ६३९- ६३५ - ६०३ - ६५८

चांदूररेल्वे- ३४८- ४०६- ४६- ८४

चांदूरबाजार - ५३६- ६०९- १९५- २७९

नांदगावखंडेश्वर- ४९८- ५६६ - ३२ - ४६

मोर्शी - ८६२- ५९४- ११५ - १५४

अंजनगावसुर्जी - ८८६ - ४२६- २७२- ६६

वरुड - ७६४- ६०६- ६९ - ३२४

तिवसा - ४३४- ३९६- १२ - १६

धारणी - ४१३ - १०७४- ७१- १५२

एकूण - ७७६८ - ७३०४- २६७७ - ३१५४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com